• Download App
    पश्चिम उत्तर प्रदेशातील डाव अखिलेश यादव यांच्यावरच उलटणार, ओवेसी फॅक्टर ठरणार समाजवादी पक्षासाठी धोक्याची घंटा|Akhilesh Yadav's innings in western Uttar Pradesh will be challenged, Owaisi factor will be a warning bell for Samajwadi Party

    पश्चिम उत्तर प्रदेशातील डाव अखिलेश यादव यांच्यावरच उलटणार, ओवेसी फॅक्टर ठरणार समाजवादी पक्षासाठी धोक्याची घंटा

    विशेष प्रतिनिधी

     उत्तर प्रदेश : पश्चिम उत्तर प्रदेशात राष्टीय लोकदलाशी युती करून अखिलेश यादव यांनी मुस्लिम-जाट आणि यादव यांना एकत्र करण्याचा डाव तर चांगलाच मांडला आहे. मात्र, मुस्लिम मतांना गृहित धरून जाटांना उमेदवारीत प्राधान्य दिल्याने अखिलेश यादव यांचा डाव उधळला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एआयएमआयचे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांचा प्रतिधिनीत्व नसल्याचे आरोप सुरू केले आहे.Akhilesh Yadav’s innings in western Uttar Pradesh will be challenged, Owaisi factor will be a warning bell for Samajwadi Party

    देशात मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असेलेले राज्य म्हणून उत्तर प्रदेशची ओळख आहे. येथील 403 जागांपैकी किमान १०० जागांवर मुस्लिम मते निर्णायक ठरतात. आत्तापर्यंत समाजवादी पक्षासोबतच मुस्लिम राहिले आहेत. मात्र, २०१७ मध्ये समाजवादी पक्षाच्या लांगुलचालनाला कंटाळून मुस्लिमविरोधी ध्रुवीकरण भाजपाच्या बाजुने झाले. ८० टक्के विरुध्द २० टक्के अशी लढाई झाली आणि भाजपाने मोठा विजय मिळविला.



    यंदाच्या निवडणुकांत अखिलेश यांनी राष्टीय लोकदलाचे जयंत चौधरी यांना सोबत घेतले आहे. माजी पंतप्रधान आणि जाट समाजाचे अनिभिषिक्त नेते चौधरी चरणसिंग यांचे ते नातू आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समाजावर त्यांची पकड आहे. राष्टीय लोकदलाशी आघाडी केल्याने अखिलेश यांनी पश्चिम उत्तर प्रदेशात बहुतांश ठिकाणी जाट उमेदवार दिले आहेत.

    मुस्लिमांना कोणताही पर्याय नसल्याने ते याच युतीला मतदान करतील, असे त्यांना वाटत आहे. परंतु, ओवेसी यांच्या रुपाने मुस्लिमांनी पर्याय शोधायला सुरूवात केली आहे, ही समाजवादी पार्टीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील जाटांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय लोकदलासोबत केलेल्या युतीचा लाभ मिळतो की नाही हे निकाल आल्यानंतरच कळेल.

    उत्तर प्रदेशातील ८५ मतदारसंघ असे आहेत जेथे मुस्लिम लोकसंख्या २५ ते ५० टक्के आहे. मात्र, भाजपकडून मांडला जात असलेला अब्बाजानचा मुद्दा किंवा मथुरेतील कृष्ण मंदिराच्या जीर्णोध्दाराची घोषणा यामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण व्हायला सुरूवात झाली आहे. मेरठ, मुझफ्फरनगर, मुरादाबाद, बरेली, बहराइच, सहारनपूर, रामपूर, बिजनौर, बलरामपूर, श्रावस्ती, गाझियाबाद, बागपत, गौतम बुद्ध नगर आणि ज्योतिबा फुले नगर या 14 जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतदार २० टक्यांपेक्षा जास्त आहे. २०१२ मध्ये, जेव्हा समाजवादी पक्ष सत्तेवर आला

    तेव्हा या ८५ पैकी ३४ जागा जिंकल्या होत्या. बसपाने २३, भाजपने १६, काँग्रेस ७, आरएलडी 3 आणि इतरांनी 2 जागा जिंकल्या होत्या. मात्र, २०१२ चा भाजप आणि आत्ताचा भाजप यांच्यामध्ये फरक झाला आहे. २०१७ मध्ये भाजपने या ६५ जागांपैकी ६४ म्हणजे ७५ टक्के जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाला १६, बसप आणि कॉँग्रसेला प्रत्येकी २ आणि राष्टीय लोकदलाला १ जागा मिळाली होती.

    २०१७ मध्ये भाजपने सर्वच पक्षांची मिळून २१ टक्के मते आपल्याकडे खेचून गेतली होती. भाजपला ४०.४ टक्के तर सपा आणि बसपा यांना अनुक्रमे 23.4 आणि 20.9 टक्के मते मिळाली. मुस्लिम समाजाचा बालेकिल्ला समजला जाणार देवबंद मतदारसंघही त्यावेळी भाजपने जिंकला होता. भाजप हिंदूंना एकत्र करण्यात यशस्वी झाला. मुस्लिमांविरोधात हिंदूंचे ध्रुवीकरण झाल्यामुळे भाजपला हा विजय शक्य झाला होता.

    आत्ताच्या निवडणुकीत ओवेसी यांचा एआयएमआयएम हा नवीन फॅक्टर आल आहे. त्यांनी १०० जागा लढविण्याची घोेषणा केली आहे. दलीत पक्षांशी युती केली आहे. ओवेसी यांनी बिहारमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या, परंतु तेजस्वी यादव यांच्या राष्टीय जनता दलाला अनेक जागांवर फटका दिला होता. उत्तर प्रदेशात हेच होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

    ओवेसी प्रतिनिधित्वाच्या राजकारणाचे प्रतीक असल्याने समाजवादी पक्षाला सावध राहावे लागणार आहे. तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांवर हल्ला करून त्यांनी तरुण मुस्लिमांमध्ये चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. मुस्लिमांना समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने त्यांच्या हातात कोलीतच मिळाले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत यावेळ ओवेसी मोठी भूमिका बजावणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

    Akhilesh Yadav’s innings in western Uttar Pradesh will be challenged, Owaisi factor will be a warning bell for Samajwadi Party

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!

    Iqbal Singh : भाजपचे इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर होणार; ‘आप’ निवडणुकीपासून दूर