• Download App
    अखिलेश यादव यांच्या गजब आघाडीला मायावती लावणार सुरुंग|Akhilesh Yadavs Gajab alliance in danger due to Mayavatis lead

    अखिलेश यादव यांच्या गजब आघाडीला मायावती लावणार सुरुंग

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशच्या सत्तेचा मार्ग पश्चिम उत्तर प्रदेशातून जातो. जाटबहुल या भागात माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्टीय लोकदलाचे जयंत चौधरी यांच्याशी युती करून गजब आघाडीचा प्रयोग केला आहे. मात्र, तिकिटवाटपात झालेल्या नाराजीचा मोठा फटका या आघाडीला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मायावती यांचा बहुजन समाज पक्ष या गजब आघाडीला सुरुंग लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.Akhilesh Yadavs Gajab alliance in danger due to Mayavatis lead

    उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जातीय समीकरणे महत्वाची ठरतात. आजपर्यंत २०१७ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी ही जातीय समीकरणे महत्वाची ठरली होती. २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जातीय समीकरणांच्या पलीकडे जाऊन मतदारांना एक केले होते. मात्र, आता पुन्हा अखिलेश यादव यांनी जातीय समीकरणे जुळविण्यावर भर दिला आहे.



    समाजवादी पक्षाने भाजपविरोधात गुर्जर, जाट, अहिर आणि ब्राह्मणांना एकत्र आणून गजब आघाडी उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला समाजवादी पक्षाच्या परंपरागत मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळणार असल्याचा त्यांना विश्वास आहे. मात्र, बहुजन समाज पक्ष या विश्वासाला सुरुंग लावणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

    पश्चिम उत्तर प्रदेशात फिरताना अगदी चार दिवसांपर्यंत वातावरण होते की भारतीय जनता पक्ष आणि समाजावादी पक्ष यांच्यात सरळ लढत होत आहे. मायावती यांचा बहुजन समाज पक्ष निवडणुकीच्या रिंगणातच नव्हता. याचे कारण म्हणजे मायावती यांनी एकही सभा घेतली नाही. एक-दोन पत्रकार परिषदा घेतल्या; त्याही फारशा प्रभावी नव्हत्या. मायावती यांनी निवडणूक सोडून दिली काय अशी चर्चाही सुरू होती. मात्र, चार दिवसांपूर्वी उमेदवारी घोषणा सुरू झाल्या आणि बहुजन समाज पक्ष चर्चेत आला आहे.

    याचे कारण म्हणजे समाजवादी पक्षाचे उमेदवारी वाटप चुकले आहे. राष्ट्रीय लोकदलाबरोबर युती असल्याने समाजवादी पक्षाला खूप तडजोडी कराव्या लागल्या आहेत. काही ठिकाणी मुस्लिम बहुल मतदारसंघ असतानाही समाजवादी पक्षाने राष्ट्रीय लोकदलाला ही जागा सोडली असून जाट उमेदवार त्याठिकाणी आहे. त्याच्या उलट जाटबहुल मतदारसंघात समाजवादी पक्षाचे मुस्लिम उमेदवार उभे आहेत.

    याच मतदारसंघात मायावती यांनी अत्यंत रणनितीपूर्वक उमेदवारी वाटप केले आहे. समाजवादी पक्षाच्या चुकीच्या उमेदवारीवाटपाचा थेट फायदा बहुजन समाज पक्षाला होणार आहे. विशेष म्हणजे बहुजन समाज पक्षाने ११५ जागांपैकी ५० ते ५५ ठिकाणी मुुस्लिम उमेदवार दिले आहेत. मुस्लिमबहुल मतदारसंघात मुस्लिम मतदार केवळ समाजवादी पक्षाचे आहेत म्हणून जाट उमेदवाराच्या मागे फरफटत जाणार की बसपच्या मुस्लिम उमेदवाराला मतदान करणा हा प्रश्न आहे. मुस्लिम समाज हा टॅक्टीकली मतदान करण्याबाबत ओळखला जातो.

    त्यामुळे बसपच्या परड्यात मुस्लिम मते जाणारच नाही असे जे गृहितक मांडले जात होते त्याला छेद बसला आहे. यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक लढती या तिरंगी होण्याची शक्यता आहे. अर्थातच तिरंगी लढतींचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे.

    विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वत: राजपूत असल्याने हा समुदाय भाजपच्या बाजूने उभा असलेला दिसत आहे. अशा वेळी सप आणि आरएलडीने गुर्जर, अहिर, जाट आणि ब्राह्मण समुदायाला एकत्र आणून नव्या समीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यालाच गजब आघाडी असे म्हटले जात आहे. राजपूत आणि ब्राह्मणांची मते सपला मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याची भरपाई यातून करण्याचा सपचा प्रयत्न आहे.

    याच हेतूने राज्यभरात प्रबुद्ध संमेलनाचे आयोजन केले होते. तिकीट वाटपातही हीच रणनीती दिसून आली. त्यावरून अखिलेश यादव हे गजब रणनीतीचा अवलंब करीत असल्याचे दिसत आहे. आघाडीतील घटक पक्षांकडून पूर्वांचल भागात ब्राह्मणांना विशेष महत्त्व दिले जात आहे. यात मागासवर्गीय आणि मुस्लिम समुदायाला जोडल्यास सपकडून मोठ्या मतदारांच्या संख्येवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.

    Akhilesh Yadavs Gajab alliance in danger due to Mayavatis lead

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!