विशेष प्रतिनिधी
लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली आहे. अखिलेश यांना जिन्ना यांचा इतका पुळका आलेला पाहून एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनीही त्यांना फटकारले आहे.Akhilesh Yadav was so fond of Jinnah that even Asuddin Owaisi slammed him
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त रविवारी अखिलेश यांनी भाषणात पटेल यांच्यासह पंडित नेहरू व महात्मा गांधी तसेच पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांना उल्लेख एकाच संदर्भान केला. सरदार पटेल यांनी परिस्थितीवर आधारित निर्णय घेतल्याने ते पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले.
सरदार पटेल, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना एकाच संस्थेत शिकले आणि बॅरिस्टर पदवी संपादन केली. त्यातून देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली, या अखिलेश यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे.
यावरून एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी अखिलेश यांना फटकारत म्हणाले, भारतीय मुस्लिमांना मोहम्मद अली जिनांशी काही घेणं-देणं नाही. आमच्या आजोबा, पंजोबांनी दोन राष्ट्रांचा सिद्धांत फेटाळून लावत भारताला आपला देश म्हणून निवडले. अशी वक्तव्ये करून एका वगार्ला खूश करू शकतो,
असं अखिलेश यादव यांना वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहेत. अखिलेश यादव यांनी आपले सल्लागार बदलले पाहिजेत. त्यांनीही थोडा इतिहास वाचावा आणि स्वत:ला शिक्षित करावे.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे पक्षाचा विजयरथ घेऊन रविवारी हरदोईमध्ये दाखल झाले. जाहीरसभेतून त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांनी एकाच संस्थेतून शिक्षण घेतले. बॅरिस्टर झाले आणि ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी एकजुटीने लढले. लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांनी आरएसएससारख्या विचारांवर बंदी घातली, असं अखिलेश यादव म्हणाले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर जिनांबाबतच्या वक्तव्यावरून टीका केली आहे. समाज तोडण्याची ही तालिबानी मानसिकता आहे, असा टोला योगींनी लगावला आहे. अखिलेश यांनी माफी मागावी अशी मागणी योगींनी केली आहे.
Akhilesh Yadav was so fond of Jinnah that even Asuddin Owaisi slammed him
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान