वृत्तसंस्था
ललितपूर : उत्तर उत्तर प्रदेशात आपल्या समाजवादी विजय यात्रेदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढविला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या ब्रह्मचर्य पालनावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विवाह या संदर्भात त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. Akhilesh yadav targets yogi, says only family man can understand family’s concerns
ललितपूर मध्ये समाजवादी विजय यात्रा आल्यावर जाहीर सभेला संबोधित करताना अखिलेश यादव म्हणाले, की माझ्यावर सत्ताधारी पक्ष भाजपचे लोक नेहमी परिवारवादाची टीका करत असतात. परंतु, फक्त एक कुटुंबवत्सल माणूसच कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची दुःखे आणि आनंद जाणू शकतो. बाकीच्यांना ते शक्य नाही. त्यामुळे माझ्यावर परिवार वादाचा आरोप करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या गैरकृत्यांना आळा घालावा आणि उत्तर प्रदेशाचा जनतेचे कल्याण करण्यासाठी काही काम करावे, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे.
आपल्या राजकीय परिवारा संदर्भात झालेल्या टीकेवर अखिलेश यादव यांनी कुटुंबवत्सलतेचे आवरण चढवून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांच्यावर आपले पिताजी मुलायम सिंग यादव आणि परिवारातल्या अन्य सदस्यांचा अपमान केल्याचा आरोप फक्त भाजपच नेते नव्हे, तर उत्तर प्रदेशातल्या काँग्रेस बहुजन समाज पक्ष तसेच अन्य छोट्या पक्षांचे नेते देखील करत आले आहेत. मुलायम सिंग यादव यांचे बंधू शिवपाल यादव यांना अखिलेश यादव यांच्या त्रासामुळे समाजवादी पक्षातून अलग व्हावे लागले आणि स्वतःचा पक्ष काढावा लागला, अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी नुकतीच केली होती. परंतु राजकीय परिवारवादाची टीका होताच त्याला अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या ब्रह्मचर्य पालनावर टीकाटिपणी करून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
Akhilesh yadav targets yogi, says only family man can understand family’s concerns
महत्त्वाच्या बातम्या
- चीन होतोय म्हातारा, विवाह करणाऱ्यांची संख्या घटू लागली वेगाने
- लोकसभेत काँग्रेसचा पराभव निश्चित ,३०० जागा मिळविणे अशक्य – गुलामनबी आझाद
- पावसाच्या धुमाकूळीने द्राक्ष, टोमॅटो भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान!!; उत्तर, मध्य पश्चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल
- ओमिक्रॉनची धास्ती, पुण्यात पुन्हा निर्बंध लागू; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका ?