वृत्तसंस्था
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सरयू नहर महाप्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यावेळी अखिलेश यादव त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर समारंभात आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांची भलीमोठी यादी वाचून दाखविली.Akhilesh yadav targets yogi aditya nath over development works
योगी आदित्यनाथ यांच्या या विकास कामांच्या दाव्याला माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.भाजप आज ज्या विकास कामांची उद्घाटने करत आहे, या विकास कामांची पायाभरणी समाजवादी पक्षाच्या काळात झाली आहे.
गोरखपूरला समाजवादी पक्षाने जमीन दिली नसती तर तिथे एम्स उभे राहिले नसते, असा दावाही अखिलेश यादव यांनी केला आहे. समाजवादी पक्षाच्या विकास कामांच्या बळावर भाजप उत्तर प्रदेशात उड्या मारत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
अखिलेश यादव म्हणाले, की समाजवादी पक्षाने गरिबांना लोहिया आवास दिला, पण भाजप सरकारने गरिबांना तिथून हाकलून लावले. समाजवादी सरकारांनी युवकांसाठी रोजगार निर्मितीचे प्रयत्न केले. भाजप सरकारने युवकांना लाठ्यांनी मारले. भाजपचे विकासाचे सगळे दावे फोल असून प्रत्यक्षात समाजवादी पक्षाच्या राजवटीतच विकास कामे झाली आहेत.
उत्तर प्रदेशला “योगी सरकारची” गरज नसून “योग्य सरकारची” आवश्यकता आहे, असे वक्तव्य देखील अखिलेश यादव यांनी करून घेतले. भाजप सरकारला फक्त राज्यामध्ये बुलडोझर चालवता येतो आणि तो बुलडोझर नेहमी विकासाचा विध्वंस करत असतो, असा दावा अखिलेश यादव यांनी केला.
Akhilesh yadav targets yogi aditya nath over development works
महत्त्वाच्या बातम्या
- वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याप्रकरणी भाजप नेत्याविरुद्धच एफआयआर; नवाब मलिक यांचा सोमय्यांवर पलटवार
- पाहा कॅटरिना कैफ आणि विकि कौशल यांच्या लग्नातील हळदीचे फोटो
- कुत्र्याच्या पिल्याला पाणी पाजवण्यासाठी, आपल्या इवल्याश्या हातांनी हॅन्डपंप चालवणाऱ्या बाळाचा व्हिडीओ पहिला का?
- ३ इडियट्स मधील ‘तो’ सीन आर माधवनच्या आयुष्यातही घडला होता, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा