विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशातल्या संभल, वाराणसी वगैरे शहरांमध्ये मशिदींखाली खोदल्यानंतर तिथे मंदिरे, बावडी बाहेर आल्या. मुस्लिम आक्रमकांचे हिंसक सत्य उघड्यावर आले, म्हणून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना दुःख झाले. त्यातूनच त्यांनी मुख्यमंत्री निवासाखाली शिवलिंग आहे. तिथेही जाऊन खोदा, असे वक्तव्य केले.
अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आगपाखड केली. संभल, वाराणसी मध्ये मशिदींच्या परिसरात आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये खोदकाम केल्यानंतर तिथे शिव मंदिरे, शिवलिंगे, बावडी हे सगळे आढळले. आत्तापर्यंत मुस्लिम वस्त्यांमध्ये कोणी जात नव्हते किंवा जाऊ दिले जात नव्हते. त्यामुळे तिथली हिंदू अस्तित्वाची प्रतीके झाकून राहिली होती.
परंतु, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तर प्रदेशात सत्यशोधन करत मुस्लिम आक्रमकांचा बुरखा फाडला. त्यातूनच संभलमध्ये ऐतिहासिक बावडी सापडली. वाराणसी मध्ये मुस्लिम वस्तीत शिवमंदिर आढळले. संभलमध्येच मुस्लिमांनी अतिक्रमण केलेले शिव मंदिर सापडले.
मुस्लिम आक्रमकांचे असे बुरखे फाटत चालल्यामुळे अखिलेश यादव यांनी रागवून पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी लखनऊमध्ये उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे त्याखाली शिवलिंग आहे तिथेही जाऊन खोदा, असे आक्रस्ताळी वक्तव्य केले.
Akhilesh Yadav Target Yogi Adityanath about Mosque
महत्वाच्या बातम्या
- वाल्मीक कराडसह 4 फरार आरोपींची बँक खाती सील; शेवटचे लोकेशन उज्जैनमध्ये, नंतर गायब
- 2025 मध्ये वर्षभर अमित शाह काँग्रेसच्या टार्गेटवर; पक्षाचे नेते “नवा मोदी” बनवायच्या असाईनमेंट वर!!
- Manipur : मणिपूरमध्ये सलग 5व्या दिवशी गोळीबारात महिला व पत्रकार जखमी; CM म्हणाले- कुकी अतिरेक्यांचा शांतता-सौहार्दावर हल्ला
- Pandharpur : पंढरपूर जवळ भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात