विशेष प्रतिनिधी
मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील यापूर्वीच्या राजवटीत फोफावलेले गुन्हेगार व माफिया यांना राज्यातील भाजप सरकारने पळवून लावले आहे. असे असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत खोटे बोलणाऱ्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना लाज वाटत नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.Akhilesh Yadav should be ashamed of lying about law and order, criticizes Amit Shah
अखिलेश यादव व राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी ऐक्याचे प्रदर्शन केल्याबद्दल शहा यांनी त्यांची खिल्ली उडवली. या पक्षांचे नेते फक्त निवडणुकीपर्यंत एकत्र दिसतील. सरकार स्थापनेची वेळ येईल तेव्हा आझम खान व अतिक अहमद यांच्यासारख्यांना महत्त्व येईल आणि चौधरी कुठेही दिसणार नाहीत, असा टोला लगावला.
शहा म्हणाले, २०१३ सालच्या मुझफ्फरनगर दंगलींचे जे बळी ठरले त्यांनाच आरोपी करण्यात आले हे कोण विसरू शकेल. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकार आणि त्यापूवीर्चे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकार यांच्या कार्यकाळातील गुन्हेगारीची तुलनात्मक आकडेवारी करावी.
यांनी पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपसाठी मते मागताना जाट समाजाचे प्रमुख नेते आणि दिवंगत पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांची आठवण केली. यापूर्वी बोलताना अमित शहा म्हणाले होते की जाट समाजाचे आणि भाजपचे गेल्या साडेसहा वर्षांपासूनचे संबंध आहेत.
Akhilesh Yadav should be ashamed of lying about law and order, criticizes Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या
- Budget 2022 : राज्यसभेच्या सदस्यांसाठी आचारसंहिता जाहीर, कामकाज सुरळीत चालण्यासाठी लागू होणार हे नियम, वाचा सविस्तर…
- पेगाससवरून विरोधकांनी पुन्हा केंद्राला घेरले : राहुल गांधींचा आरोप –मोदी सरकारने देशद्रोह केला!, सुब्रमण्यम स्वामी म्हणतात- मोदी सरकारने खंडन करावे!
- टेलिकॉम कंपन्यांना ट्रायच्या सूचना : प्रीपेड मोबाइल ग्राहकांना रिचार्जची वैधता २८ ऐवजी ३० दिवस द्यावी लागेल
- राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? मानहानीच्या खटल्याची ठाण्यातील न्यायालयात दररोज होणार सुनावणी