विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील जिल्हा परिषद निवडणुकांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर गैैरप्रकार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. गैरप्रकारांमुळे या निवडणुकीत पराभव झाला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष साडेतीनशे जागा मिळविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Akhilesh Yadav shocked by defeat in Zilla Parishad polls, said that he will get three and a half hundred seats in the forthcoming assembly election
भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकांत सत्तेचा वापर केला. अनेक गैरप्रकार केले. भाजपाच्या लोकशाहीविरोधी वर्तणुकीमुळे घटनात्मक संस्थांना धोका निर्माण झाला असल्याच आरोप करून अखिलेश यादव म्हणाले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छळकपट करून आपला संभाव्य पराभव विजयात बदलला.
त्यामुळे भाजपामध्ये वाह वा चालली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष ३५० जागा निश्चित मिळवेल. भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊन विरोधी नाईलाजाने विरोधी पक्षात बसावे लागेल.
अखिलेश यादव म्हणाले अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रशासनाला हाताशी धरून जनादेशाचा अपमान केला आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवारांना आणि त्यांच्या सूचकांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून बलपूर्वक रोखण्यात आले.
समाजवादी पार्टीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा छळ केला जात आहे. या सगळ्यावर अंकुश ठेवण्याऐवजी निवडणूक आयोग आणि राजभवनही मूक दर्शक बनले आहे.
Akhilesh Yadav shocked by defeat in Zilla Parishad polls, said that he will get three and a half hundred seats in the forthcoming assembly election
महत्त्वाच्या बातम्या
- सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या घातल्याच्या प्रकरणात केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांचीही नाराजी, ट्विटरवर फोटो केले शेअर
- आंबिल ओढा प्रकरणी बिल्डरवर कारवाई करा अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
- बोलतो त्याप्रमाणे चालतो याचा अर्थ वाघ सर्कशीतलाच, त्याचा रिंगमास्टरही वेगळा, नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला
- ओबीसी आरक्षणात आता चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या विवाहाची
- कुणी आम्हाला डिवचले, धमकी दिली तर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा