पुन्हा पुन्हा त्याच चुका, संघावर बंदी लादून आग शिलगवा; विरोधकांच्या राजकीय अकलेचा पेटलाय वणवा!!, असं म्हणायची वेळ काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या अति वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीमुळे आलीय. Akhilesh Yadav
कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारने सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांवर संघाच्या शाखेवर जायला बंदी घातली. संघाच्या शाखा सार्वजनिक मैदानावर भरवायला बंदी लादली. पण कर्नाटक हायकोर्टाने या दोन्ही बंदी उधळून लावत सिद्धरामय्या सरकारचे कान उपटले. संघाच्या कुठल्या activity वर कायद्यानुसार बंदी आहे??, आणि त्या activity मध्ये सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी सामील झालेत का??, असे दोन सवाल कर्नाटक हायकोर्टाने सिद्धरामय्या सरकारला विचारले, ज्यांची समाधानकारक उत्तरे सरकार देऊ शकले नाही. त्यामुळे हायकोर्टाने संघावर बंदी लादण्याचा सिद्धरामय्या सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवत सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची मूभा दिली आणि सार्वजनिक ठिकाणी संघाला शाखा लावायला सुद्धा परवानगी दिली. संघावर बंदी लागण्याच्या या राजकीय प्रकारात काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारची पुरती नाचक्की झाली.
पण काँग्रेसच्या बाबतीमध्ये हे कमी पडले म्हणून की काय आज समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी संघावर बंदी लादण्याची भाषा केली. या देशात नवीन सरदार पटेल निर्माण व्हावेत आणि त्यांनी संघ विचारसरणीवर बंदी लादावी, असे वक्तव्य अखिलेश यादव यांनी केले.
– बंदी लादायची खुमखुमी
संघाची शताब्दी सुरू असताना संघावर बंदी लादण्याच्या विरोधकांची खुमखुमी अजून काही जात नाही, हेच राजकीय सत्य यातून समोर आले. वास्तविक संघावर बंदी लादून संघ विचार दबत नाही. संघटना सुद्धा कमकुवत होत नाही. उलट सर्व विचार जास्त फैलावतो आणि संघाची संघटना सुद्धा जास्त activate होते, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. 1948, 1975 आणि 1992 या वर्षांमध्ये संघावर केंद्र सरकारने बंदी लादली. त्यानंतर कायदेशीर संघर्ष करून संघ सतत वाढत गेला. संघावर बंदीचा फारसा दुष्परिणाम झालाच नाही. जो काही दुष्परिणाम व्हायचा, तो काही स्वयंसेवकांवर आणि काही संघ अधिकाऱ्यांवर वैयक्तिक पातळीवर झाला, पण त्या पलीकडे संघ विचारसरणीचे किंवा संघटनेचे फारसे नुकसान झाले असे उदाहरण दिसले नाही. उलट संघावरच्या बंदीचा स्वयंसेवक आणि त्यांच्या राजकीय घटकांनी लाभ उठवून संघाच्या विस्ताराचे काम मात्र चांगले करून घेतल्याचे उदाहरण समोर आले.
– संघातल्या खऱ्या उणिवांवर आघाताचा अभाव
हा राजकीय इतिहास फारसा जुना नसताना काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांना पुन्हा संघावर बंदी लादायची खुमखुमी आलीय. ही काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या राजकीय बुद्धीचा वणवा पेटल्याची खूण आहे. वास्तविक संघावर बंदी लादून संघ विचार दबणार नाही किंवा संघटना ही मोडकळीस येऊ शकणार नाही. संघ विचारांचा मुकाबला अधिक वैचारिक प्रगल्भतेने केला पाहिजे. त्याचबरोबर संघातल्या खऱ्या उणीवा लोकांसमोर आणून त्यावर आघात केला पाहिजे हे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांना समजेनासेच झाले आहे.
– संघ विचारात अनेक उणीवा
संघाची विचारसरणी आणि संघटना बांधणी पूर्ण निर्दोष आहे, असे अजिबात नाही. उलट संघाच्या संघटना बांधणीत अनेक उणिवा आहेत. अनेक ठिकाणी अनेक विषयांवर संघाची विचारसरणी एकांगी आहे. संघाचे स्वयंसेवक आणि संघाचे नेते अनेकदा पठडीतून बाहेर येऊन विचारही करू शकत नाहीत. संघ स्वयंसेवकांवर करत असलेले संस्कार आणि संघ परिवाराचे राजकीय वर्तन या प्रचंड विसंगती आहे. किंबहुना परस्पर विरोध सुद्धा आहे. संघ स्वयंसेवक आपल्या विरोधकांना वैचारिक पातळीवर निष्प्रभ करू शकत नाहीत. संघाच्या या उणिवांचा थोडा अभ्यास केला, तरी विरोधकांना संघाची मर्मस्थाने समजू शकतील. या उणिवांवर आघात केला, तर त्याचा काँग्रेस आणि समाजवादी नेत्यांना अधिक अनुकूल परिणामही मिळू शकेल पण त्यासाठी संघाची मर्मस्थाने नीट अभ्यासली पाहिजेत आणि मगच त्यावर आघात केला पाहिजे, पण सध्याच्या काँग्रेस नेतृत्वात आणि समाजवादी पक्षाच्या नेतृत्वात या अभ्यासाचीच मोठी उणीव आहे. त्यामुळेच संघावर खरे आघात करण्यापेक्षा त्याच्यावर बंदी लादायचे खुळचट विचार त्यांच्या वणवा पेटलेल्या राजकीय बुद्धीतून त्यांनी समोर आणलेत.
Akhilesh Yadav says the need is that someone in this country should become Sardar Patel and ban this (RSS) ideology again.
महत्वाच्या बातम्या
- गड-किल्ल्यांवरील नमो पर्यटन सेंटरवरून राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
- Israel-Gaza : युद्धबंदीच्या 17 दिवसांनंतर इस्रायलचा गाझावर भीषण हल्ला; 140 नागरिक ठार, हमासला ट्रम्प यांची धमकी
- 17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!
- India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार
