• Download App
    Akhilesh Yadav उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत अखिलेश यादव

    Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत अखिलेश यादव यांनी केली मोठी घोषणा!

    Akhilesh Yadav

    विधानसभेचा कार्यकाळ मे २०२७ पर्यंत असणार आहे


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ – Akhilesh Yadav  समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी २०२७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबद्दल मोठी घोषणा केली आहे. अखिलेश यादव म्हणाले, ‘समाजवादी पक्ष आणि काँग्रेस २०२७ च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील.’ लखनऊ येथील समाजवादी अल्पसंख्याक सभेच्या बैठकीत अखिलेश यादव यांनी हे जाहीर केले.Akhilesh Yadav

    या बैठकीत सहारनपूरमधील सपा नेत्यांनी इम्रान मसूदचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु अखिलेश यादव यांनी त्यांना बसवले आणि विधानसभा निवडणुकीत इंडि आघाडी कायम राहील असे सांगितले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी म्हटले होते की उत्तर प्रदेशच्या काँग्रेसला कोणत्याही कुबड्याची गरज नाही आणि विधानसभा निवडणुकीत ८०-१७ चा फॉर्म्युला चालणार नाही.



    अखिलेश यादव यांनी २०१७ मध्ये यूपीमध्ये काँग्रेससोबत युती केली होती. या निवडणुकीत समाजवादीला ४७ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला फक्त सात जागा मिळाल्या आणि यूपीमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले होते. २०१७ च्या निवडणुकीत एनडीएला ३२४ जागा मिळाल्या पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत इंडि आघाडीला यूपीमध्ये मोठे यश मिळाले. समाजवादी पक्षाला ३७ आणि काँग्रेसला सहा जागा मिळाल्या होत्या.

    उत्तर प्रदेशातील शेवटच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये झाल्या होत्या आणि विधानसभेचा कार्यकाळ मे २०२७ पर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत, पुढील विधानसभा निवडणुका २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे. साधारणपणे कार्यकाळ संपण्यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये निवडणुका होऊ शकतात. निवडणूक आयोगाने अद्याप २०२७ च्या निवडणुकांच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केलेल्या नाहीत..

    Akhilesh Yadav makes big announcement regarding Uttar Pradesh assembly elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे