• Download App
    राम मंदिर निर्माण कार्याला स्थगिती करण्याचीच अखिलेश यादव वाट पाहतोहेत, अमित शाह यांचा आरोप|Akhilesh Yadav is waiting to postpone the construction of Ram temple, Amit Shah alleges

    राम मंदिर निर्माण कार्याला स्थगिती करण्याचीच अखिलेश यादव वाट पाहतोहेत, अमित शाह यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    जालौन : विरोधकांना राम मंदिर उभारले जावे अशी अजिबात इच्छा नाही. आपले सरकार केव्हा येईल आणि राम मंदिराच्या निर्माण कार्याला स्थगित करता येईल याचीच अखिलेश यादव वाट पाहात आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.Akhilesh Yadav is waiting to postpone the construction of Ram temple, Amit Shah alleges

    अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील जालौन भागात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, येत्या निवडणुकीत चौकार लगावत बुआ आणि बबुआचा सुपडासाफ करण्याचा इरादा जनतेनं केला आहे.



    अबकी बार ३०० पार होणार. इथं बहनजी येतात आणि केवळ एकाच जातीसाठी काम करतात. अखिलेश येतात दुसऱ्या जातीसाठी काम करतात आणि निघून जातात. पण भाजपा इथं सबका साथ आणि सबका विकास करतात

    अखिलेश यादव यांच्यावर हलबोल करताना शाह म्हणाले, बाबू (अखिलेश) सध्या खूपच संतापलेले दिसतात. कारण मोदींनी ट्रिपल तलाकचा मुद्दा देखील संपुष्टात आणला आहे. विरोधकांना राम मंदिर उभारले जावे अशी अजिबात इच्छा नाही. आपले सरकार केव्हा येईल आणि राम मंदिराच्या निर्माण कार्याला स्थगित करता येईल याचीच अखिलेश यादव वाट पाहात आहेत.

    ४०३ विधानसभा मतदार संघांत जन विश्वास यात्रा'उत्तर प्रदेशातील सर्व सहा क्षेत्रांमध्ये जन विश्वास यात्रा फिरणार आहे आणि राज्याच्या सर्व ४०३ विधानसभा जागांवर ही विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे. आज जिथं जिथं यात्रा पोहोचत आहे. तिथं खूप गर्दी जमा होते, असे अमित शाह यांनी सांगितले.

    Akhilesh Yadav is waiting to postpone the construction of Ram temple, Amit Shah alleges

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप