विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि राहुल गांधींची काँग्रेस यांनी आघाडी केली असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीचा अडथळा पार करण्यामध्ये या दोघांनाही खूप अडचणी येत आहेत. त्या अडचणी प्रतिस्पर्धी भाजप किंवा बहुजन समाज पक्ष यांच्या नसून दोन्ही पक्षांच्या अंतर्गत वादामुळे दोघांनाही आपले उमेदवार जाहीर करताना दमछाक होत आहे. Akhilesh yadav had to change 9 candidates of his samajwadi party under pressure of his own partymen
पण त्या पलीकडे जाऊन अखिलेश यादव यांची तर तेवढी राजकीय नाचक्की झाली आहे की त्यांना एक-दोन ठिकाणी नव्हे तर तब्बल 9 ठिकाणी जाहीर केलेले उमेदवार बदलावे लागले आहेत. मूळात अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाचा गड असलेल्याच ठिकाणी आधी उमेदवार जाहीर केले होते, पण नंतर त्यांच्याच समर्थकांमध्ये झुंज लागल्याने त्यांना एकापाठोपाठ एक उमेदवार बदलणे भाग पडले.
अखिलेश यादव यांना बागपत, संभल, गौतम बुद्ध नगर, मिसरीख, बदायूँ, मुरादाबाद रामपूर, मेरठ या लोकसभा मतदारसंघातले मुदत उमेदवार बदलावे लागले. त्यातला मेरठचा उमेदवार चा दोनदा बदलावा लागला. कारण त्यांचा आजम खान आणि शिवपाल यादव अशा बड्या नेत्यांशी जोरदार झगडा झाला. स्थानिक कार्यकर्त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर एवढा दबाव आणला की, त्यांनी उमेदवार बदलले नसते, तर स्थानिक कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून त्याचे दुसऱ्यांचे उमेदवारी अर्ज सायकल चिन्हावर भरले असते आणि महाराष्ट्रातल्या शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस साठी समाजवादी पार्टीवर राजकीय परिस्थिती ओढवली असती.
अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी 63 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी फक्त 27 जागांवरचे उमेदवार त्यांनी जाहीर केले होते. त्यापैकी 9 जागांचे उमेदवार त्यांना बदलावे लागले. त्यामुळे अखिलेश यादव कितपत आत्मविश्वासाने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊ शकतील??, असा सवाल तयार झाला आहे.
– अमेठी, रायबरेलीवर प्रश्नचिन्हच
त्याचबरोबर काँग्रेसला अमेठी सारख्या आणि रायबरेली सारख्या बालेकिल्ल्यात अजूनही उमेदवार सापडायला तयार नाही. अमेठी किंवा रायबरेलीतून प्रियांका गांधी किंवा त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा लढणार असल्याच्या नुसत्याच अटकळी बांधल्या गेल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात काँग्रेस तिथून आपला उमेदवार जाहीर करू शकलेली नाही.
Akhilesh yadav had to change 9 candidates of his samajwadi party under pressure of his own partymen
महत्वाच्या बातम्या
- आपने नव्या वादाला फोडले तोंड, भगतसिंग-आंबेडकरांसोबत केजरीवालांचा फोटो, भाजपने घेतला आक्षेप
- मिशन 400 च्या नाहीत नुसत्याच गप्पा; भाजपने वाढविला तरी कसा मुस्लिम मतांचा टक्का??; वाचा सविस्तर!!
- लडाखमध्ये ‘इमर्जन्सी लँडिंग’ दरम्यान IAFच्या अपाचे हेलिकॉप्टरला अपघात
- लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निकाल राखून ठेवला