• Download App
    अखिलेश यादव यांनी कन्नौजमधून दाखल केली उमेदवारी, जाणून घ्या, यादव कुटंबाकडे किती संपत्ती? |Akhilesh Yadav filed his candidacy and announced his wealth through an affidavit

    अखिलेश यादव यांनी कन्नौजमधून दाखल केली उमेदवारी, जाणून घ्या, यादव कुटंबाकडे किती संपत्ती?

    उत्तर प्रदेशातील कन्नौज मतदारसंघात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे.


    लखनऊ : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आज निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. दरम्यान, पुढील टप्प्यामधील निवडणुकीसाठी देशभरात उमेदवार आपला अर्ज दाखल करत असून, शपथपत्राद्वारे संपत्तीही जाहीर करत आहेत. समाजावादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गुरुवारी कन्नौज मतदासंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून आपल्याकडील संपत्तीही जाहीर केली.Akhilesh Yadav filed his candidacy and announced his wealth through an affidavit



    कन्नौज लोकसभा मतदारसंघातून अखिलेश यादव 2000 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. त्यांनी 2004 आणि 2009ची निवडणूकही याच मतदारसंघातून जिंकली होती. 2012मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाच्या खासदरपदाची राजीनामा दिला होता. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी डिंपल या बिनविरोध निवडून आल्या होत्या. 2014च्या मोदी लाटेतही डिंपल या निवडणूक जिंकल्या होत्या. मात्र 2019च्या निवडणुकीत भाजपचे सुब्रत पाठक यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत मैनपुरीमधून निवडणूक लढवत आहेत, तर अखिलेश यादव करहल मतदारसंघातून आमदार आहेत. कन्नौज मतदारसंघात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या ठिकाणी अखिलेश यादव यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार सुब्रत पाठक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

    अखिलेश यादव यांच्याकडे संपत्ती किती? –

    अखिलेश यादव आणि त्यांच्या कुटुंबाकडे जवळपास 42 कोटींची संपत्ती आहे. अखिलेश यादव यांच्याजवळ 25 लाख 61 हजारांहून अधिक रोकड तर त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्याजवळ पाच लाख 72 हजारांहून अधिक रक्कम आहे. अखिलेश यादव यांच्या बचत खात्यामध्ये एक कोटी 49 लाखांहून अधिक रुपये जमा आहेत. तर त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्या सहा बचत खात्यांमध्ये तीन कोटी 16 लाख रुपयांहून अधिक रुपये जमा आहेत. याचबरोबर त्यांची मुलगी आदिती यादवच्या लखनऊमधील अॅक्सिस बँकेच्या बचत खात्यात 11 लाख 11 हजार रुपयांहून अधिक जमा आहे. त्यांचे लंडनच्या लॉयड्स बँकेतही एक खातं आहे, ज्यामध्ये 1595 पाउंड्स जमा आहे.

    तसेच अखिलेश यादव यांनी त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत शेती आणि जनहिताची कामे दर्शवला आहे. त्यांच्याकडे 17 एकर पेक्षा अधिक शेती योग्य जमीन आहे. अखिलेश यांची दोन कोटी 30 लाख रुपयांची एफडी आणि डिंपल यादव यांच्याकडे 76 लाखांहून अधिकची एफडी आहे. अखिलेश यादव यांनी 2.13 कोटी रुपये आपले वडील मुलायम सिंह यादव आणि पत्नी डिंपल यादवला 54 लाख रुपयांहून अधिकचे कर्जही दिले आहे.

    डिंपल यादव यांच्याकडे जवळपास 60 लाखांचे दागिने आहे.. 2.774 किलो पेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि 127.75 कॅरेटचा हिरा आहे. ज्याची किंमत 59,76,687 रुपये आहे आणि 203 ग्रॅम मोती देखील आहेत. तर अखिलेश यादव यांच्याकडे सोने-चांदी किंवा अन्य कोणतीही आभूषण अथवा वस्तू नाहीत. 76 हजारांहून अधिक रुपयांचा एक मोबाइल फोन, 5 लाख 34 हजारांचे जीमचे साहित्य आणि 1 लाख 60 हजारांची क्रॉकरी आहे

    Akhilesh Yadav filed his candidacy and announced his wealth through an affidavit

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स