वृत्तसंस्था
लखनऊ : एकीकडे समाजवादी पार्टीत भाजपमधून आमदार मंत्र्यांचे इन्कमिंग होत असताना दुसरीकडे त्यांच्याशी आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांची पूर्ण निराशा झाली आहे. तब्बल 1 महिना 3 दिवस वाट पाहून आणि वाटाघाटी करून समाजवादी पक्षाशी भीम आर्मीची निवडणूक युती झालीच नाही. उलट अखिलेश यादव यांनी बहुजन समाजाचा अपमान केला, असा गंभीर आरोप चंद्रशेखर आजाद यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.Akhilesh Yadav does not want Dalits in this alliance, he just wants Dalit vote bank
अखिलेश यादव यांना दलित नेते आपल्या आघाडीत नकोच आहेत. त्यांना फक्त दलित व्होट बँक पाहिजे आहे. पण ते बहुजन समाजाचा अपमान करतात, असा घणाघाती हल्लाबोल चंद्रशेखर आजाद यांनी केला आहे. आजाद यांच्या या नव्या पवित्र्यामुळे गेले तीन-चार दिवस समाजवादी पक्षाच्या गोटात जो राजकीय आनंद पसरला होता त्यावर आता विरजण पडले आहे.
चंद्रशेखर आझाद म्हणाले, की समाजवादी पक्षाशी युती व्हावी यासाठी मी 1 महिना 3 दिवस सलग प्रयत्न केले. अखिलेश यादव यांना भेटण्यास भेटलो. त्यांच्याशी चर्चा केल्या समाजवादी पक्षाच्या अन्य नेत्यांनाही भेटून युसी करण्यासंदर्भात विनंती केली. परंतु या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही. बहुजन समाजाविषयी त्यांच्या मनात आली आहे. हे स्पष्ट दिसले. मी मान्यवर काशीराम यांना नेता मानतो. त्यांनी नेताजींना (मुलायम सिंग यादव) विश्वास ठेवून मुख्यमंत्री बनवले होते. परंतु, सत्तेवर आल्यानंतर बहुजन समाजावर समाजवादी पक्षाने मी अन्यायच केला. दलितांच्या जमिनींवर कब्जा करण्यात आला. महिलांवर बलात्कार झाले. अखिलेश यादव यांच्या राजवटीत असे होणार नाही याची काय खात्री आहे?, असा खोचक सवालही चंद्रशेखर आझाद यांनी यावेळी केला.
अखिलेश यादव यांच्या 2017 पूर्वीच्या राजवटीवर गुंड आणि माफियागिरी यांचे आधीच आरोप आहेतच, याची आठवणही त्यांनी करून दिली.
Akhilesh Yadav does not want Dalits in this alliance, he just wants Dalit vote bank
महत्त्वाच्या बातम्या
- वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कठोर निर्बंध होण्याची शक्यता , अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
- नेपाळच्या सीमेवर नाशिकच्या जवानाला वीरमरण , उच्चदाब प्रवाहाचा विजेच्या तारेचा धक्क्याने 3 सैनिकांची प्राणज्योत मालवली
- हिंदूंनी एका घरात कमीत कमी तीन मुले जन्माला घालावीतच, मिलिंद परांडे यांचे वादग्रस्त विधान