विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 26 जून 1975 इंदिरा गांधींनी लागलेल्या आणीबाणीच्या मुद्द्यावर लोकसभेत नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निषेधाचा सूर काढल्याबरोबर काँग्रेस सह बाकीच्या विरोधकांनी गदारोळ केला. पण सदना बाहेर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी आणीबाणीच्या मुद्द्यावरून भाजपला खेचले आणि काँग्रेसला टोचले. Akhilesh pulled the BJP on the issue of Emergency
आणीबाणीच्या मुद्द्यावर तुम्ही किती दिवस नुसते भूतकाळात डोकवत राहणार??, भविष्याचा वेध घेणार की नाही??, असे सवाल करून अखिलेश यादव यांनी भाजपला खेचले. त्याचवेळी त्यांनी फक्त भाजपचेच लोक आणीबाणी तुरुंगात गेलेत असे नव्हे, तर समाजवादी पक्ष, जनता पक्ष या पक्षांचे नेतेही तुरुंगात गेले. त्यांनी कष्ट भोगले. अयोध्येचे खासदार अवधेश पासी हे त्याचे भुक्तभोगी आहेत, पण भाजप सरकार ने त्यांच्या भत्यामध्ये किंवा सुविधांमध्ये वाढ केलेली नाही.
लोकतंत्र रक्षक सैनिकांना भाजपने वाऱ्यावर सोडले. समाजवादी पार्टीच्या सरकारने त्यांना कायदेशीर अधिकार देऊ त्यांना भत्ता दिला. तो आता 20000 रुपये आहे. पण महागाई किती वाढली आहे. भाजपने नुसते आणीबाणीच्या विरोधात बोलू नये. लोकतंत्र रक्षक सैनिकांचा भत्ता वाढवावा. त्यांच्या सुविधा वाढवाव्यात. भाजपने आधी लोकतंत्र रक्षक सैनिकांचा पत्ता 1 लाख रुपये करावा आणि मग आमच्याशी बोलायला यावे, असा टोमणा अखिलेश यादव यांनी भाजपला मारला.
पण त्याचवेळी अखिलेश यादव यांनी लोकतंत्र रक्षक सैनिकांचा उल्लेख करून काँग्रेसने त्यांच्यावर कसा अत्याचार केला, आणीबाणीच्या नावाखाली त्यांना तुरुंगात डांबून लोकशाहीची कशी हत्या केली, हे अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सुनावले. अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी 32 खासदारांसह एक मोठी ताकद लोकसभेत आली आहे. सध्या ते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडीत आहेत. पण अखिलेश यादव यांनी आणीबाणीच्या मुद्द्यावर काँग्रेसला टोचण्याचे देखील सोडले नाही त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय बनला.
Akhilesh pulled the BJP on the issue of Emergency
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे + पवारांच्या संभाव्य खेळी ओळखून दिल्ली + महाराष्ट्रात काँग्रेसची सावध पण दमदार पावले!!
- राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील, I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत निर्णय
- केजरीवालांना मोठा झटका, उच्च न्यायालयाने जामीन देण्यास दिला नकार!
- भाजपला डॅमेज करून महायुतीतून खसकण्याचा अजितदादांचा डाव??; स्वबळावर लढण्याचे मिटकरींचे विधान!!