• Download App
    Amit Shah अखिलेश यादवांनी घराणेशाही पक्षांच्या अध्यक्षांवर अमित शाहांकडून करवून घेतले पुढच्या 25 वर्षांचे "शिक्कामोर्तब"!!

    अखिलेश यादवांनी घराणेशाही पक्षांच्या अध्यक्षांवर अमित शाहांकडून करवून घेतले पुढच्या 25 वर्षांचे “शिक्कामोर्तब”!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भाजपला फटकारून अखिलेश यादव यांनी घराणेशाहीच्या पक्षांच्या अध्यक्षांवर आज अमित शाह यांच्याकडून पुढच्या 25 वर्षांचे “शिक्कामोर्तब” करवून घेतले.

    – त्याचे झाले असे :

    लोकसभेत waqf बोर्ड सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत भाग घेताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी भाजपला वेगवेगळ्या विषयांवरून चिमटे काढले. त्यात त्यांनी भाजपच्या अध्यक्षपदाचा मुद्दा देखील उकरून काढला. एवढा मोठा भाजप पक्ष, जो स्वतःला जगातला सगळ्यात मोठा पक्ष समजतो, तो अजून स्वतःचा अध्यक्ष निवडून शकलेला नाही, असा टोमणा अखिलेश यादव यांनी भाजपला मारला.

    अखिलेश यादव यांच्या या टोमण्याचे रूपांतर गृहमंत्री अमित शाह यांनी संधी मध्ये कन्व्हर्ट केले. अखिलेश यादव यांनी भाजपच्या अध्यक्षपदावरून टोकताच अमित शहा उठले आणि म्हणाले, अखिलेशजींनी भाजपच्या अध्यक्ष पदाविषयी आम्हाला टोकले. पण त्यांनी हसत हसत हे सगळे सांगितल्याने मी देखील हसत हसतच उत्तर देतो.

    समोर बसलेले चार-पाच पक्ष जे आहेत, त्यांना घरातूनच अध्यक्ष नेमायचेत. त्यामुळे अखिलेश यादव यांनी पुढची 25 वर्षे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून स्वतःला घोषित करावे. त्याला आमची काही हरकत नाही. भाजपमध्ये मात्र कसे होत नाही. कारण 12 – 13 कोटी सदस्यांमधून लोकशाही प्रक्रिया करून अध्यक्ष निवडावा लागतो. त्यामुळे अध्यक्ष निवडायला आम्हाला वेळ लागतो. अमित शाह यांचा हा प्रतिटोला ऐकताच अखिलेश यादव यांनी हात जोडत त्यांच्या प्रतिटोल्याला प्रतिसाद दिला.

    “Unable to find new president…” Akhilesh mocks BJP, Amit Shah’s humorous retort stuns Lok Sabha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले