विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग येत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आम आदमी पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी संजय सिंह यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात धोरणात्मक चर्चा केली.AKhilesh meets AAP leader
अखिलेश यांनी कालच राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांची भेट घेतली होती.अखिलेश यादव यांनी राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा केली होती.
या भेटीचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट करताना चौधरी यांनी ‘बढते कदम’ असे सूचक ट्विट केले होते.सिंह यांनी यापूर्वीही अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. मात्र, उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आप स्वतंत्रपणे लढवेल असेही त्यांनी सांगितले होते.
त्याचप्रमाणे, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांच्या पुस्तक प्रकाशनालाही सिंह उपस्थित होते. अखिलेश यादव यांच्यासह समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादवही यावेळी उपस्थित होते
AKhilesh meets AAP leader
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी विरुद्ध दीदी… काँग्रेस मुक्त भारताच्या दिशेने निघालेली सुसाट गाडी…!!
- ममता एकीकडे विचारतात अखिलेशना मदत हवी आहे का? दुसरीकडे अखिलेश यांची आप नेत्यांशी हातमिळवणी!!
- रात्रीस खेळ चाले मालिकेतून अपूर्वाची माघार! मालिका सोडण्याचे काय स्पष्टीकरण दिले अपूर्वाने?
- पाईप मध्ये लपवून ठेवले 10 लाख रुपये! कर्नाटकातील रेडचा व्हिडीओ होतोय वेगाने व्हायरल