• Download App
    राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला अखिलेश का नाही आले??; काँग्रेस - समाजवादी पार्टीत विसंवाद!!|Akhilesh come to the conclusion of Rahul Gandhi's Bharat Jodo Nyaya Yatra??; Disagreement between Congress and Samajwadi Party!!

    राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला अखिलेश का नाही आले??; काँग्रेस – समाजवादी पार्टीत विसंवाद!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपासाठी INDI आघाडीचे बाकीचे सगळे नेते आले, पण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव मात्र पोहोचले नाहीत. ते नेमके का आले नाहीत??, असा सवाल अनेक ठिकाणी विचारला गेल्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी अखिलेश यादव आजारी असल्याचे सांगून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला, पण खुद्द अखिलेश यादव यांनी त्यानंतर लखनऊतून एक पत्रक काढून आपण निवडणूक तयारीत मग्न असल्यामुळे मुंबईत आलो नसल्याचा खुलासा केला. त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात “कन्फ्युजन” असल्याचे जनतेसमोर आले.Akhilesh come to the conclusion of Rahul Gandhi’s Bharat Jodo Nyaya Yatra??; Disagreement between Congress and Samajwadi Party!!



    मुंबईतल्या आजच्या महारॅलीमध्ये INDI आघाडीतले बाकीचे सगळे नेते आले, पण  अखिलेश यादव का आले नाहीत??, असा सवाल पत्रकारांनी रमेश चेन्निथला यांना केला. त्यावर अखिलेश यादव व्हायरल फिवरने आजारी आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असे उत्तर त्यांनी त्याला यांनी दिले. हे उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली, पण चेन्निथला यांचे उत्तर माध्यमांनी टीव्ही चॅनेलवर चालवून काही मिनिटेच झाली नाहीत, तोच अखिलेश यादव यांचा वेगळाच खुलासा समोर आला.

    अखिलेश यादव यांनी राहुल गांधींना पत्र लिहून ते आपल्या सोशल मीडिया हँडल वरून व्हायरल केले. उत्तर प्रदेश मध्ये 20 मार्चपासून निवडणूक अर्ज भरायचा दिवस असल्याने निवडणुकीच्या कामाची घाई गर्दी उडाली आहे. आपण मुंबईत येऊ शकलो नाही, पण भाजपचा पराभव करायला आपण एकत्र आहोत, अशी ग्वाही अखिलेश यादव यांनी या पत्रातून दिली.

    पण रमेश चेन्निथला यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याचा खुलासा आणि अखिलेश यादव यांनी लिहिलेले पत्र याच्यातली विसंगती मात्र लपून राहिली नाही. त्यामुळे INDI आघाडीत एकत्र असले तरी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीतल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये किती विसंवाद आहे हेच समोर आले.

    Akhilesh come to the conclusion of Rahul Gandhi’s Bharat Jodo Nyaya Yatra??; Disagreement between Congress and Samajwadi Party!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य