• Download App
    समाजवादी पक्षात मुलायमसिंह विरुध्द अखिलेश गटबाजी, अनेक जुने नेते पक्ष सोडणार |Akhilesh against Mulayam Singh in Samajwadi Party, many old leaders will leave the party

    समाजवादी पक्षात मुलायमसिंह विरुध्द अखिलेश गटबाजी, अनेक जुने नेते पक्ष सोडणार

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव अशी गटबाजी सुरू झाली आहे. मुलायम सिंह यादव यांच्या अनेक समर्थक नेत्यांनी अखिलेश यांना थेट विरोध करण्यास सुरूवात केली आहे. हे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांना मुलायम सिंह यादव यांचेच आशिर्वाद आहेत, अशीही चर्चा सुरू आहे.Akhilesh against Mulayam Singh in Samajwadi Party, many old leaders will leave the party

    शफीकउर रहमान आणि आजम खान यांनी अखिलेश यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. सलमान जावेद राईन यांनी अखिलेश यादव यांची आजम खान आणि आमदार नाहीद हसन व शहजिल यांच्यासाठी आवाज न उठविल्याने पक्षाचा राजीनामा दिला. राईन यांनी राजीनामा पत्रातून त्यांनी ज्यापद्धतीने पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.



    आता सर्व नेते विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत पराभूत झालेल्यांना पदावरून हटविण्याची मागणी करीत आहेत. अखिलेश यादव अशा नेत्यांच्या कोंडाळ्यात असल्याने त्यांची निवडणूक रणनीती कागदीच ठरली. कार्यकतेर्ही पक्षप्रमुखांनी मतदारांची उपेक्षा केल्याचा आरोप करीत आहेत.

    विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत यादव-मुस्लिम मतदारांनी यावेळी सपाला विजयी करण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षांतर्गत अनेक निर्णय घेण्यात आले. आता मुस्लिम नेत्यांचा एक गट खुलेआम आरोप करीत आहे की, मुस्लिम समुदायाला डावलण्यात आले. आजम खान यांनी स्वतंत्र पक्ष किंवा राजकीय आघाडी स्थापन केल्यास काहीही नवल वाटणार नाही, असे वरिष्ठ पत्रकार गिरीश पांडेय यांचे मत आहे.

    आजम खान यांनी पक्ष सोडलेला आहे. ते एक आघाडी स्थापन करू शकतात. यात ओवैसी यांचा समावेश असू शकतो. आजम खान दोन वर्षे तुरुंगात राहिल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. सलमान जावेद राईन यांनी याच नाराजीतून राजीनामा दिला. लवकरच मुलायम सिंह यांचे अनेक सहकारी आणि निवडणुकीआधी पक्षात आलेले नेते समाजवादी पार्टी सोडतील, असे संकेत आहेत. शिवपाल यादवही आजम यांच्या संपर्कात आहेत. अखिलेश यांचे चुलते शिवपाल यादव यांनीही त्यांच्या निवडणूक रणनीतीला विरोध केला होता.

    Akhilesh against Mulayam Singh in Samajwadi Party, many old leaders will leave the party

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य