• Download App
    'आसाम असते तर पाच मिनिटांत हिशोब केला असता' हिमंता बिस्वा यांचे अकबरुद्दीन ओवेसींना आव्हान! Akbaruddin criticized Chief Minister Himanta Biswa Sarma on Owaisi

    ‘आसाम असते तर पाच मिनिटांत हिशोब केला असता’ हिमंता बिस्वा यांचे अकबरुद्दीन ओवेसींना आव्हान!

    ओवेसी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही हिमंता यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याला उघडपणे धमकावल्याचा मुद्दा जोर धरत आहे. पोलिसांनी ओवेसीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही या प्रकरणावरून अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. ही घटना आसाममध्ये घडली असती तर पोलिसांनी 5 मिनिटांतच हिशोब केला असता असेही सरमा यांनी म्हटले आहे. Akbaruddin criticized Chief Minister Himanta Biswa Sarma on Owaisi

    काय आहे संपूर्ण प्रकरण?

    चंद्रयांगुट्टा मतदारसंघातील AIMIM उमेदवार अकबरुद्दीन ओवेसी एका सभेला संबोधित करत होते. यादरम्यान पोलिसांनी ओवेसी यांच्याकडे इशारा करत त्यांना सांगितले की, आता दहा वाजणार आहेत त्यामुळे त्यांना त्यांची सभा संपवावी लागेल. यावरून अकबरुद्दीन संतापले आणि त्याने पोलिस अधिकाऱ्याला धमकावून स्टेजवरून हटवले आणि मला थांबवणारा अजून जन्माला आलेला नाही, असंही ओवेसींनी म्हटलं.



    काय म्हणाले मुख्यमंत्री सरमा?

    अकबरुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या जाहीर सभेत एका पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की ही अत्यंत दुःखद घटना आहे. आसाममध्ये असा प्रकार घडला असता तर पोलिसांनी पाच मिनिटांत हिशोब केला असता, परंतु तेलंगणातील तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे पोलीस आणि पक्ष दोघेही काही बोलले नाहीत. आज काँग्रेस आणि बीआरएस दोन्ही गप्प आहेत. ओवेसी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही हिमंता यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

    Akbaruddin criticized Chief Minister Himanta Biswa Sarma on Owaisi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड