• Download App
    बीबीसी मोदी डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंग विरोधात अँटनी यांच्या मुलाचा काँग्रेसचा राजीनामावृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीने प्रदर्शित केलेल्या मोदी विरोधी डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगचा आग्रह केरळ प्रदेश काँग्रेसने धरल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. बीबीसी ने प्रदर्शित केलेल्या मोदीविरोधी डॉक्युमेंट्रीला ब्रिटिश पंतप्रधान ब्रिटिश ऋषी सूनक यांनी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये देखील विरोध दाखवला होता. भारत सरकारने या डॉक्युमेंटरीवर बंदी घातली आहे, तरी देखील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ या दोन कॅम्पस मध्ये त्या डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग करण्यात आले. केरळ प्रदेश काँग्रेसने 26 जानेवारी रोजी प्रदेश कार्यालयात मोदीविरोधी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग ठेवले आहे. या डॉक्युमेंटरी च्या विरोधात अनिल अँटनी यांनी ट्विट केले होते. बीबीसीने तयार केलेल्या मोदी विरोधी डॉक्युमेंटरी मुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका उत्पन्न होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र त्यानंतर अनेक काँग्रेस समर्थकांनी त्यांना सोशल मीडियावर असभ्य भाषेत ट्रोल केले. त्यावर उद्विग्न होऊन अनिल अँटनी यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसच्या सोशल मीडियाचे राष्ट्रीय पातळीवरचे निमंत्रक होते, तसेच केरळ प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियाचे प्रभारी होते. काँग्रेसने व्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य याचा आग्रह धरल्याचा दावा केला आहे. मी सभ्य भाषेत मोदीविरोधी डॉक्युमेंटरीला विरोध दर्शवला होता. परंतु काँग्रेस समर्थकांनी माझी असभ्य भाषेत संभावना केली. त्यामुळे मी काँग्रेस कडची असलेली सरळ जबाबदारीचे पदे सोडत आहे, असे ट्विट अनिल अँटनी यांनी केले आहे. ak anthony son resigns from congress a day after calling out bbc documentary

    बीबीसी मोदी डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंग विरोधात अँटनी यांच्या मुलाचा काँग्रेसचा राजीनामा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीने प्रदर्शित केलेल्या मोदी विरोधी डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगचा आग्रह केरळ प्रदेश काँग्रेसने धरल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ak anthony son resigns from congress a day after calling out bbc documentary

    बीबीसी ने प्रदर्शित केलेल्या मोदीविरोधी डॉक्युमेंट्रीला ब्रिटिश पंतप्रधान ब्रिटिश ऋषी सूनक यांनी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये देखील विरोध दाखवला होता. भारत सरकारने या डॉक्युमेंटरीवर बंदी घातली आहे, तरी देखील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ या दोन कॅम्पस मध्ये त्या डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग करण्यात आले. केरळ प्रदेश काँग्रेसने 26 जानेवारी रोजी प्रदेश कार्यालयात मोदीविरोधी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग ठेवले आहे. या डॉक्युमेंटरी च्या विरोधात अनिल अँटनी यांनी ट्विट केले होते. बीबीसीने तयार केलेल्या मोदी विरोधी डॉक्युमेंटरी मुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका उत्पन्न होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला होता.

    मात्र त्यानंतर अनेक काँग्रेस समर्थकांनी त्यांना सोशल मीडियावर असभ्य भाषेत ट्रोल केले. त्यावर उद्विग्न होऊन अनिल अँटनी यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसच्या सोशल मीडियाचे राष्ट्रीय पातळीवरचे निमंत्रक होते, तसेच केरळ प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियाचे प्रभारी होते. काँग्रेसने व्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य याचा आग्रह धरल्याचा दावा केला आहे. मी सभ्य भाषेत मोदीविरोधी डॉक्युमेंटरीला विरोध दर्शवला होता. परंतु काँग्रेस समर्थकांनी माझी असभ्य भाषेत संभावना केली. त्यामुळे मी काँग्रेस कडची असलेली सरळ जबाबदारीचे पदे सोडत आहे, असे ट्विट अनिल अँटनी यांनी केले आहे.

    ak anthony son resigns from congress a day after calling out bbc documentary

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार