प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस यांचे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पहिल्या अधिवेशनाला पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार आक्रमक झाले होते. सत्ताधारी आमदारांना आपण सत्तेत असल्याचे भान नाही, असे ते म्हणाले होते. त्याचबरोबर सरकार सत्तेवर येऊन देखील अनेक निर्णय प्रलंबित आहेत. राज्यात ओला दुष्काळ पडला आहे तरी देखील शेतकऱ्याकडे सरकार लक्ष देत नाही असा आरोप अजितदादांनी केला होता. विविध मागण्यांचे पत्र सात पानी पत्र त्यांनी सरकारला दिले आहे. Ajitdada is aggressive on the eve of the legislature
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी अधिकाऱ्याला निकृष्ट आहाराच्या मुद्द्यावरून मारले होते हा मुद्दा अजितदादांनी उचलून धरला कोण एक सत्ताधारी गटाचे आमदार अधिकाऱ्यांना मारत आहेत. कोणी डॉक्टरांना धमकी देत आहेत. हे महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
अजितदादांच्या या आक्रमक पवित्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक आक्रमक होत प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे – पवार सरकार गेल्यामुळे अजितदादांना त्रास होणारच. कारण खरं सरकार तेच चालवत होते. आता शिंदे – फडणवीस जोडगोळीमुळे त्यांना सरकार चालवता येत नाही. याचा त्यांना त्रास होतो आहे, असा प्रतिटोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांबरोबर चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत शिंदे आणि फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकार या मधला फरक सांगितला. जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडीचे बेईमान सरकार आले होते. ते आता गेले आहे आणि जनतेने कौल दिल्यानुसार शिवसेना – भाजप युतीचे सरकार आले आहे, असा टोला फडणवीस यांनी चिमूर मधल्या एका कार्यक्रमात लगावलाच होता. तो पुन्हा एकदा अजितदादांच्या आक्रमक पवित्र्याला उत्तर देताना लगावला आहे.
– विधिमंडळात रंगणार कलगीतुरा
उद्यापासून जे विधिमंडळ अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये सत्ताधारी शिंदे फडणवीस गट सरकार विरुद्ध शिवसेनेचा ठाकरे गट अधिक राष्ट्रवादी काँग्रेस यांचा जोरदार सामना रंगणे अपेक्षित आहे. परंतु शिंदे – फडणवीस यांनी आजच जोरदार प्रतिआक्रमण करून अजित दादांच्या प्रत्येक मुद्द्याला पत्रकार परिषदेचे उत्तर देऊन टाकले आहे. आपले सरकार आल्यानंतर तब्बल 750 निर्णय घेतले. यात शेतकऱ्यांच्या दुप्पट अनुदानाच्या निर्णयाचाही समावेश आहे हे अजितदादा विसरले, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
Ajitdada is aggressive on the eve of the legislature
महत्वाच्या बातम्या
- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी, राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
- मुकेश अंबानींना विष्णूने ‘अफजल’ बनून दिली होती धमकी, अटकेनंतर खुलासा
- तेलंगणात तिरंगा फडकवल्यानंतर TRS नेत्याची निर्घृण हत्या, दगडफेकीनंतर परिसरात कलम 144 लागू
- द फोकस एक्सप्लेनर : भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची होणार, पण ही 8 आव्हाने समोर; वाचा सविस्तर…