विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात थांबून अजितदादांनी अरुणाचल प्रदेशात डंका वाजविला आहे. राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांना विजयाचा टिळा लागला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 उमेदवार अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजितदादांनी महाराष्ट्रात थांबून अरुणाचल प्रदेशात डंका वाजविला आहे. Ajit pawar’s NCP gets 3 seats in arunachal Pradesh assembly elections
अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमत मिळवून सत्ता खेचून आणली आहे. याच आघाडीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सामील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अरुणाचल प्रदेश मध्ये मोठ्या प्रचार सभा घेतल्या. परंतु अजित पवार अरुणाचल प्रदेशात प्रचाराला गेल्याच्या बातम्या आल्या नाहीत. अजित पवार लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रा प्रचार करत होते, तरी देखील त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांनी अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
BJP- 46
NPEP-5
NCP-3
Congress – 1
OTH-3
अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड सारख्या छोट्या राज्यांमध्ये स्थानिक राजकारणाच्या गुंतागुंतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या छोट्या पक्षांची चिन्हे तिथले स्थानिक उमेदवार घेतात. आपापल्या राजकीय तडजोडी करून ते तिथे निवडून येतात. परंतु पक्षाचे चिन्ह घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला विजयाचा टिळा लागतो. हा राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असतानाचा देखील अनुभव होता. शरद पवार कधीच अरुणाचल किंवा नागालँड सारख्या राज्यांमध्ये प्रचाराला गेल्याच्या बातम्या आल्या नाहीत. परंतु तिथे राष्ट्रवादी काँग्रेस विशिष्ट मतदारसंघांमधून निवडून येतच असे.
- सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांच्या गटाला इशारा, शरद पवारांचा फोटो वापरू नका; अन्यथा ‘घड्याळ’ काढून घेऊ
पवारांच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक पी. ए. संगमा हे मूळचे मेघालयचे होते. त्यामुळे त्यांचा स्थानिक राजकारणावर प्रभाव होता. अर्थातच त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय पाळेमूळे ईशान्य भारताचा रूजवली. पण निधनापूर्वी पी. ए. संगमा पवारांपासून वेगळे झाले होते, त्यांनी स्वतःच्या प्रभावाखालचा स्वतंत्र पक्ष काढून मेघालयात विशिष्ट प्रभाव निर्माण केला होता.
अरुणाचल प्रदेशातल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयामागे स्थानिक राजकारणाच आहे. स्थानिक उमेदवारांनी स्वतंत्रपणे तडजोडी करून केवळ पक्ष चिन्ह घ्यायचे म्हणून घड्याळ चिन्ह घेऊन ते निवडून आले आहेत. अजित पवार तिथे प्रचाराला गेले नव्हते. तरीदेखील तिथल्या स्थानिक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर, पण स्वबळावर अरुणाचल विधानसभेत विजय मिळवला आहे.