• Download App
    अजित पवार धादांत खोटे बोलताहेत; विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून नानांचा हल्लाबोल Ajit Pawar spoke untruth, targets nana patole regarding speaker Post resignation

    अजित पवार धादांत खोटे बोलताहेत; विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून नानांचा हल्लाबोल

    प्रतिनिधी

    मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या नाना पटोले यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आज आमने-सामने आले आहेत. नाना पटोले यांनी एकतर विधानसभेचे अध्यक्षपदाचा राजीनामा परस्पर द्यायला नको होता आणि त्यांनी राजीनामा दिलाच तर महाविकास आघाडीने वर्षभरात विधानसभा अध्यक्षपद भरायला हवे होते, अन्यथा अशी वेळ आलीच नसती, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. त्याला नाना पटोलेंनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. Ajit Pawar spoke untruth, targets nana patole regarding speaker Post resignation

    मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा परस्पर दिलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना भेटूनच मी, बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण या नेत्यांनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी त्यावेळी मी राजीनामा देऊ नका, अशी सूचना केली होती. पण मला काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पद दिल्यानंतर राजीनामा देण्याचे वरून आदेश झाले होते. त्यामुळे मी राजीनामा दिला. तो सगळ्यांना सांगून दिला. अजित पवार जे बोलत आहेत, ते धादांत खोटं बोलत आहेत, असा गंभीर आरोप नानांनी केला.



    त्याचवेळी नानांनी अजितदादांच्या कबुली नाम्यावर देखील बोट ठेवले. मी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष तर राष्ट्रवादीचे होते. त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार होते. तरी त्यांनी 16 आमदारांना अपात्र ठरविले नाही. हा दोष त्यांचा आहे, असा ठपका नानांनी राष्ट्रवादीवर ठेवला.

    भाजपला नैतिकतेच्या मुद्द्यावर देखील त्यांनी सुनावले. उद्धव ठाकरेंना भाजपचे नेते आज नैतिकता शिकवतात, पण तेव्हा पहाटेचे सरकार बनविणे ही नैतिकता होती का?, असा खोचक सवाल करून नानांनी आजही नैतिकतेच्या मुद्द्यावर शिंदे – फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा अशीच मागणी लावून धरली. पण पहाटेचे सरकार या मुद्द्यावर अजितदादानांही टोचले.

    सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे पठणवीस सरकार स्थिर झाले आहे, पण दुसरीकडे महाविकास आघाडी आक्रमक होऊन शिंदे – फडणवीस सरकारवर तुटून पडण्याऐवजी आघाडीतच मोठे मतभेद उत्पन्न झाले आहेत. त्यातूनच अजितदादा आणि नाना पटोले यांच्या राजकीय युद्धाला तोंड फुटले आहे.

    Ajit Pawar spoke untruth, targets nana patole regarding speaker Post resignation

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही