पीके मिश्रा पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिव पदावर कायम राहणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर अजित डोवाल यांनाही सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) बनवण्यात आले आहे. ते पुन्हा त्याच पदावर राहणार आहेत. दरम्यान, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा पुढील आदेशापर्यंत त्याच पदावर राहणार आहेत. त्यांची नियुक्ती 10 जून 2024 पासून लागू होईल. तसेच माजी आयएएस अधिकारी अमित खरे आणि तरुण कपूर पुढील आदेशापर्यंत पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून काम पाहतील.Ajit Doval appointed as National Security Advisor for the third consecutive time!
डॉ पीके मिश्रा प्रधान सचिव म्हणून कायम राहिल्याने आणि अजित डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा काम सुरू केल्याने ते दोघेही पंतप्रधानांचे सर्वाधिक काळ प्रमुख सल्लागार राहिले आहेत. डोवाल, 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दहशतवादविरोधी कारवायांमध्ये आणि आण्विक समस्यांमध्ये तज्ञ आहेत.
डॉ. पीके मिश्रा हे 1972 च्या बॅचचे निवृत्त अधिकारी आहेत, ते भारत सरकारच्या कृषी सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर मागील दोन टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होते. डॉ. मिश्रा आणि NSA अजित डोवाल हे दोघेही पंतप्रधान मोदींच्या सर्वात विश्वासू लोकांमध्ये गणले जातात, कारण ते दोघेही 2014 मध्ये मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीपासून त्यांच्याशी संबंधित आहेत.
अजित डोवाल यांनी पंजाबमध्ये आयबीचे ऑपरेशनल चीफ आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून काम केले आहे. यामुळे दोन्ही संवेदनशील भागात पाकिस्तानचे कारस्थान समजून घेण्याचा त्यांना अनुभव आहे.
Ajit Doval appointed as National Security Advisor for the third consecutive time!
महत्वाच्या बातम्या
- अभिनेता नसीरुद्दीन शाहचा मुस्लिमांना सल्ला- सानियाचा स्कर्ट सोडून शिक्षणाचं बघा, पीएम मोदींना जाळीदार टोपी घातलेले पाहायचंय!
- शरद पवारांचा सरकार बदलण्याचा एल्गार, पण रोहित पवारांचा फक्त डबल डिजीट आमदार निवडून आणण्याचा निर्धार!!
- खलिस्तानी फुटीरांकडून इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; मोदींच्या दौऱ्यापूर्वी अडथळ्याचा डाव!!
- पेमा खांडू हेच होणार अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री!