• Download App
    २६ नोव्हेंबरपासून एअरटेलचा टॅरिफ प्लॅन लागू , सविस्तर जाणून घ्या रिचार्ज प्लॅनमध्ये नेमके काय बदल झाले । Airtel's tariff plan to be implemented from November 26, find out exactly what changes have been made in the recharge plan

    २६ नोव्हेंबरपासून एअरटेलचा टॅरिफ प्लॅन लागू , सविस्तर जाणून घ्या रिचार्ज प्लॅनमध्ये नेमके काय बदल झाले

    एअरटेलच्या एंट्री लेव्हल टॅरिफ व्हॉईस प्लॅनची ​​किंमत सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे.तर अमर्यादित व्हॉईस बंडल योजनेत २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. Airtel’s tariff plan to be implemented from November 26, find out exactly what changes have been made in the recharge plan


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सोमवारी दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेलने अनेक प्री-पेड टॅरिफ प्लॅनमध्ये २० ते २५ टक्के वाढीची घोषणा केली आहे. यामुळे टॅरिफ व्हॉईस प्लॅन, अमर्यादित व्हॉइस प्लॅन आणि डेटा टॉप-अपच्या किंमतीत वाढ झाली आहे.एअरटेलच्या एंट्री लेव्हल टॅरिफ व्हॉईस प्लॅनची ​​किंमत सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे.तर अमर्यादित व्हॉईस बंडल योजनेत २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

    भारती एअरटेलने प्री-पेड टॅरिफ प्लॅनमध्ये केलेल्या वाढीबाबत कंपनीने सांगितले आहे की , कंपनी नेहमी मोबाइल सरासरी कमाईवर वापरकर्त्याला (ARPU) २०० ते ३०० रुपये शिल्लक ठेवू इच्छिते.ही रक्कम शिल्लक असल्याने कंपनीला भांडवलावर वाजवी परतावा मिळू शकेल.



    5G नेटवर्क आणण्यास मदत

    पुढे कंपनीने म्हंटले आहे की,अशा ARPU पातळीमुळे कंपनीला नेटवर्क आणि स्पेक्ट्रममध्ये गुंतवणूक करण्यासही मदत होईल.तसेच याचा फायदा असा होईल की ते एअरटेलला देशात 5G नेटवर्क आणण्यास मदत करेल.यासाठी कंपनीने या महिन्यात नोव्हेंबर २०२१ पासून एअरटेलचा टॅरिफ प्लॅन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ नोव्हेंबरपासून नवीन बदल लागू केले जाऊ शकतात.

    रिचार्ज प्लॅनमध्ये नेमके काय असतील

    जर रिचार्ज प्लॅनबद्दल विचार केला तर, आता एअरटेलच्या ७९ रुपयांच्या प्लॅनसाठी ९९ रुपये तुम्हाला मोजावे लागतील. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.दरम्यान कंपनीने दावा आहे की या प्लॅनमध्ये ५० टक्के अधिक टॉक-टाइम उपलब्ध असेल. त्याचे व्हॉइस टॅरिफ चार्ज १ पैसे प्रति सेकंद असेल.त्याचप्रमाणे अनलिमिटेड व्हॉईस बंडल आणि डेटा प्लॅनमध्येही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये एअरटेलचा स्वस्त रिचार्ज प्लान ७९ रुपयांचा आहे.

    Airtel’s tariff plan to be implemented from November 26, find out exactly what changes have been made in the recharge plan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!