विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतावर प्रत्यक्ष हल्ल्यांपेक्षा फेक न्यूजचे हल्ले जास्त केले. पण या पार्श्वभूमीवर भारताने अतिशय उत्तम strategy अंमलात आणून पाकिस्तान वरले हल्ले टप्प्याटप्प्याने उलगडले. त्यासाठी सॅटॅलाइट इमेजेस फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ यांचे स्पष्ट पुरावे सगळ्यात जगासमोर आणले.
गेल्या चार दिवसातली लढाई या आधीच्या सर्व लढायांपेक्षा पूर्ण वेगळी होती. या लढाईत सर्व अत्याधुनिक शस्त्रांचा आणि तंत्रज्ञानाचा भारतीय सैन्य दलाने अचूक वापर केला. पाकिस्तानी सैन्य दलांनी वापरलेली चिनी आणि तुर्की बनावटीची सगळी मिसाइल्स आणि ड्रोन्स निकामी केली. भारतीय सैन्य दलाने तीन स्तरीय संरक्षण कवच वापरले त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचे सगळे हल्ले निकामी झाले, असे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी स्पष्ट केले.
– 7, 11, 14
ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर सुरुवातीला भारताने पाकिस्तान मध्ये 9 दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचे सांगितले होते. त्यामध्ये 7 पाकिस्तानी हवाई तळ होते. काल रात्री उशिरा भारतीय हवाई दलाने खुलासा करून पाकिस्तान मधल्या 11 हवाई तळांवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले. पण आज भारतीय सैन्य दलाच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स DGMO यांच्या पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए. के. भारती यांनी प्रत्यक्ष नकाशा दाखवून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातल्या 14 हवाई तळांवर हल्ले केल्याचे स्पष्ट केले. त्यामध्ये भारतीय हवाई दलाने इस्लामाबाद पासून कराची पर्यंत सगळीकडे पाकिस्तानला ठोकल्याचे दिसून आले.
भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!
ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दलाने इस्लामाबाद आणि रावळपिंडी नजीक नूर खान हवाई तळावर अचूक हल्ला करून मारा केल्यानंतर “अचानक” भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. नूर खान हवाई तळावरील हल्ला यात turning point ठरल्याचे बोलले गेले, कारण त्याच्या नजीकच्याच किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना भारताने धक्का लावल्याचे मानले गेले. त्यातून पाकिस्तानात अणू किरणोत्साराचा म्हणजेच atomic radiation चा धोका वाढला. अमेरिकेच्या विमानाला तिथे टेहळणी करावी लागली. पाकिस्तानात रेडिएशन विरोधी बोरॉन मूलद्रव्य मागवावे लागले. ते इजिप्शियन विमानातून तिथे पोहोचले.
*या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलांच्या तिन्ही डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए. के. भारती यांना प्रश्न विचारण्यात आला भारतीय हवाई दलाने किराणा हिल्स वरील पाकिस्तानी atomic installations ना धक्का लावलाय का??, त्यावर एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले, “thank you very much किराणा हिल्स वर पाकिस्तानचे atomic installations आहेत, हे तुम्ही आम्हाला सांगितले. आम्हाला ते “माहिती” “नव्हते”, पण भारतीय हवाई दलाने जी काही किराणा हिल्स आहे, तिथे कुठेही हल्ला केला नाही. तसे माझ्या कालच्या ब्रीफिंग मध्ये नव्हते आणि आजच्या ब्रीफिंग मध्येही नाही!!””
मात्र “असे” उत्तर देऊन एअर मार्शल भारती यांनी अप्रत्यक्षपणे कानावर हात ठेवले. भारती यांच्या या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत हास्याची लकेर पसरली. त्यामुळे सगळ्यांना भारती यांच्या उत्तरा मधले between the lines व्यवस्थित लक्षात आले.
– इस्लामाबाद ते कराची हवाई हल्ले
एअर मार्शल भारती यांनी आजच्या पत्रकार परिषदेत नकाशे आणि फोटो दाखवून भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांची तपशीलवार माहिती दिली. भारतीय हवाई दलाने सुरुवातीला 7 पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचे सांगितले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा खुलासा करून 11 पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचे भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले होते. मात्र आज एअर मार्शल भारती यांनी दाखविलेल्या नकाशात इस्लामाबाद, लाहोर पासून कराची पर्यंत 14 पाकिस्तानी हवाई तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केल्याचे दिसून आले.
Air Marshal AK Bharti says, “…This was a different kind of warfare and is bound to happen
महत्वाच्या बातम्या
- भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा
- ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी
- कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!