• Download App
    ६८ वर्षांनंतर पुन्हा एअर इंडिया टाटांची : रतन टाटा म्हणाले 'वेलकम बॅक', तब्बल १८ हजार कोटीमध्ये झाला करार । Air India Privatisation Update Ratan Tata say Welcom Back, Tata Sons wins the bid for acquiring national carrier Air India

    एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा टाटांची : रतन टाटा म्हणाले ‘वेलकम बॅक’, तब्बल १८ हजार कोटींमध्ये झाला करार

    Tata Sons wins the bid for acquiring national carrier Air India : एअर इंडियाला टाटा समूहच खरेदी करणार हे आता निश्चित झाले आहे. तब्बल 18,000 कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे. अर्थ मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) ही घोषणा केली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे नेतृत्व टाटा करणार आहे. Air India Privatisation Update Ratan Tata say Welcom Back, Tata Sons wins the bid for acquiring national carrier Air India


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : एअर इंडियाला टाटा समूहच खरेदी करणार हे आता निश्चित झाले आहे. तब्बल 18,000 कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे. अर्थ मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) ही घोषणा केली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे नेतृत्व टाटा करणार आहे.

    डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे म्हणाले की, जेव्हा एअर इंडिया विनिंग बिडर हातात जाईल, तेव्हा त्याच्या बॅलेन्सशीटवर असलेले 46,262 कोटी रुपयांचे कर्ज सरकारी एआयएएचएलकडे जाईल. ते म्हणाले की, या करारात सरकारला 2,700 कोटी रुपयांची रोकड मिळेल.

    या करारात एअर इंडियाच्या जमिनी आणि इमारतींसह कोणतीही मालमत्ता विकली जाणार नाही. एकूण 14,718 कोटी रुपयांची ही मालमत्ता AIAHL या सरकारी मालकीच्या कंपनीला देण्यात येईल. कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग कंपनी AISATS ची अर्धी भागीदारीही मिळेल.

    डीआयपीएएमच्या सचिवांनी सांगितले की, स्पाइसजेटच्या अध्यक्षांच्या कन्सोर्टियमने 15,000 कोटी रुपयांची बोली लावली होती. ते म्हणाले की, डिसेंबरपर्यंत हा करार पूर्ण होईल, म्हणजेच व्यवहार पूर्ण होईल.

    काही दिवसांपूर्वी आल्या होत्या बातम्या

    काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्गच्या वृत्तात दावा करण्यात आला होता की, टाटा सन्सने एअर इंडिया खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली आहे. पण सरकारने टाटा समूहाची बोली स्वीकारल्याच्या वृत्ताला खोडून काढले आणि सांगितले की, या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

    स्पाइस जेटपेक्षा 3 हजार कोटी रुपयांनी जास्तीची बोली

    ब्लूमबर्गच्या याच अहवालानुसार, टाटा समूहाने स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांच्यापेक्षा सुमारे 3,000 कोटी रुपयांची अधिक बोली लावली होती. एअर इंडियासाठी बोली लावण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर होती, त्यानंतर टाटा समूह एअर इंडिया खरेदी करू शकेल, असा अंदाज होता.

    15 ते 20 हजार कोटींची राखीव किंमत

    सरकारने एअर इंडियामधील संपूर्ण १०० टक्के हिस्सा विकण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. एअर इंडियासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयुष गोयल आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया होते. सूत्रांच्या माहितीनुसार, एअर इंडियाची राखीव किंमत 15,000 ते 20,000 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती.

    एअर इंडियावर प्रचंड कर्ज

    अनेक वर्षांपासून कर्जबाजारी असलेल्या एअर इंडियाला विकण्याच्या सरकारच्या प्रयत्न अपयशी ठरत होते. 2018 मध्ये 76% हिस्सा विकण्यासाठी बोली मागवली होती आणि व्यवस्थापन नियंत्रण कायम ठेवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यात कोणीही स्वारस्य दाखवले नाही, तेव्हा सरकारने व्यवस्थापन नियंत्रणासकट विकण्याचा निर्णय घेतला.

    टाटांची विमानसेवा टाटांकडे परत

    जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स सुरू केली होती. दुसर्‍या महायुद्धानंतर जगभरात विमान क्षेत्रावर वाईट परिणाम झाला. अशा परिस्थितीत मंदीचा सामना करण्यासाठी नियोजन आयोगाने सर्व विमान कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण सुचवले होते.

    Air India Privatisation Update Ratan Tata say Welcom Back, Tata Sons wins the bid for acquiring national carrier Air India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य