Taloja Oxygen Plant : राज्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या तळोजा प्रकल्पातील एका घटनेची आता चर्चा होत आहे. एका स्पेअर पार्टमुळे ऑक्सिजन प्लांट बंद पडण्याच्या मार्गावर होता, परंतु केंद्राने तत्परतेने मदत केल्याने प्राणवायूचा पुरवठा अखंडित राहू शकला. Air Force Helps to Bring Important Spare Part From Gujrat For Taloja Oxygen Plant
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या तळोजा प्रकल्पातील एका घटनेची आता चर्चा होत आहे. एका स्पेअर पार्टमुळे ऑक्सिजन प्लांट बंद पडण्याच्या मार्गावर होता, परंतु केंद्राने तत्परतेने मदत केल्याने प्राणवायूचा पुरवठा अखंडित राहू शकला.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, दि. 10 मे रोजी तळोजातील ऑक्सिजन प्लांटमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ऑक्सिजन निर्मितीवर प्रभाव होणार होता. यादरम्यान राज्यातील अधिकारी केंद्राशी सातत्याने संपर्कात राहिले. 16 तासांहून अधिक काळ ही अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हवाई दलाने गुजरात आवश्यक असलेला स्पेअर पार्ट वेगाने पोहोचवल्याने प्लांटमधील ऑक्सिजन निर्मिती अखंडित राहू शकली.
तळोजामध्ये लिंडे इंडिया संयंत्राद्वारे राज्यातील रुग्णालयांना दररोज तब्बल 243 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होतो. येथील संयंत्रांत 10 मे रोजी 55 हजार रुपये किमतीच्या एक स्पेअर पार्ट खराब झाला होता. या स्पेअर पार्टची गुजरातच्या मेहसाणा येथे निर्मिती होते. भारतीय हवाई दलाने रात्रभरातून अहमदाबादहून मुंबईला तो स्पेअर पार्ट एअरलिफ्ट करून दिला. हा स्पेअर पार्ट पहाटे 4.30 वाजता प्लांटमध्ये पोहोचला.
कंपनीने 10 मे रोजी दुपारीच संयंत्रातील बिघाडाबाबत आजूबाजूच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. यामुळे त्यांना पुरेपूर कल्पना होती की, प्लांट जर बंद पडला तर मोठे संकट ओढवले असते. त्यांनी त्वरित राज्यातील ऑक्सिजन टीमला सूचित केले. जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, गुजरातच्या मेहसाणामध्ये हा स्पेअर पार्ट तयार होतो व तो तयार करण्यासाठी 24 तासांचा वेळ लागतो. यानंतर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मेहसाणाचे जिल्हाधिकारी एचके पटेल यांना मदत मागितली. त्यांनी त्या कंपनीला वेगाने स्पेअर पार्ट करण्याचे निर्देश दिले. हा स्पेअर पार्ट रस्त्याने आणण्यात 48 ते 72 तासांचा वेळ लागला असता, यामुळे याचा गंभीर परिणाम ऑक्सिजन पुरवठ्यावर झाला असता. अशावेळी केंद्राच्या निर्देशानंतर हवाई दल मदतीला धावून आले. हवाई दलाने स्पेअर पार्ट तयार होताच तो विशेष विमानाने वेळेच्या आधी मुंबईत पोहोचवला.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचा सर्वाधिक तुटवडा जाणवला. यासाठी देशभरात ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले. केंद्राने तत्परतेने ऑक्सिजन एक्स्प्रेस, कॉन्सन्ट्रेटर्स तसेच ऑक्सिजन हवेतून शोषून निर्मिती करणारे प्लांट उभारले. अनेक राज्यांत आता ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींनी पीएम केअर्स फंडमधून देशभरात 551 पीएसए ऑक्सिजन प्लांटला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मिती होऊ शकेल.
Air Force Helps to Bring Important Spare Part From Gujrat For Taloja Oxygen Plant
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Cases In India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट, २४ तासांत ४ हजारांहून जास्त मृत्यूंमुळे चिंता कायम
- Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दराचा पुन्हा भडका, अनेक शहरांत १०० रुपयांच्या पुढे!
- मराठवाड्याचे सुपुत्र काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं दु:खद निधन
- Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर एनडीआरएफ सतर्क, अनेक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता
- वांद्रेमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक, 19 मेपर्यंत कोठडी