• Download App
    हवाई दलाचे लढाऊ विमान तेजस जैसलमेरमध्ये कोसळले|Air force fighter plane Tejas crashed in Jaisalmer

    हवाई दलाचे लढाऊ विमान तेजस जैसलमेरमध्ये कोसळले

    सरावासाठी येत असताना घडली दुर्घटना


    विशेष प्रतिनिधी

    भारतीय हवाई दलाचे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस आज जैसलमेरजवळ ऑपरेशनल ट्रेनिंग फ्लाइट दरम्यान क्रॅश झाले. मात्र, या अपघातात पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. ही संपूर्ण घटना जवाहर कॉलनी येथील असल्याची माहिती आहे. सराव सुरू असताना भील वसतिगृहाजवळ विमान कोसळल्याचा व्हिडिओ समोर येत आहे.Air force fighter plane Tejas crashed in Jaisalmer



    जैसलमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र सिंह यांनी सांगितले की, पायलट सुखरूप बाहेर पडल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारतीय वायुसेनेनेही आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवर ही माहिती दिली आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले की भारतीय वायुसेनेचे तेजस विमान आज जैसलमेरमध्ये ऑपरेशनल ट्रेनिंग फ्लाइट दरम्यान क्रॅश झाले. पायलट सुखरूप बाहेर आला आहे.

    राजस्थानमधील पोखरण फायरिंग रेंज येथे तिन्ही सैन्याच्या स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उपकरणांचे सामर्थ्य दाखवण्यासाठी ‘भारत शक्ती’ या मेगा सरावाला मंगळवारी सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे उपस्थित होते. या सराव दरम्यान, सुमारे 50 मिनिटे स्वदेशी संरक्षण क्षमतांचे समन्वित प्रदर्शन केले जात आहे. हा सराव जमीन, हवाई, समुद्र, सायबर आणि अंतराळ क्षेत्रातील धोक्यांचा सामना करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांच्या एकात्मिक ऑपरेशनल क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी केला जात आहे.

    Air force fighter plane Tejas crashed in Jaisalmer

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!