• Download App
    कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय हवाई दल मोलाची कामगिरी, जगातून मदत आणण्यात सिंहाचा वाटा Air force doing great job in corona war

    कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय हवाई दल मोलाची कामगिरी, जगातून मदत आणण्यात सिंहाचा वाटा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – देशात कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय हवाई दल मोलाची भूमिका बजावत आहे. परदेशातून ऑक्सिजन, औषधे, पीपीई किट यासारखे वैद्यकीय साहित्य एअरलिफ्ट करण्याचे काम सातत्याने हवाई दलाकडून केले जात आहे. भारतीय हवाई दलाने कोविड रुग्णांच्या मदत कार्यासाठी ४२ मालवाहू विमाने तैनात केली आहेत. यात १२ अधिक वजन तर ३० मध्यम वजनाचे साहित्य वहन करू शकणाऱ्या विमानांचा समावेश आहे.  Air force doing great job in corona war

    लष्कराचे जवान हवाई आणि जहाजाच्या मदतीने अन्य देशातील मदत भारतापर्यंत आणत आहेत. कोरोनाचा हाहा:कार पाहता अमेरिका, इस्राईलसह अनेक देशांनी वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला आहे. हे साहित्य हवाई दलाचे विमान देशातील विविध भागात पोचवण्याचे काम करत आहे. मदतकार्य करताना हवाई दलातील कर्मचारी बाधित होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.



     

    तब्बल ४२ विमानांच्या मदतीने भारतात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सामग्री आणण्यात आली आहे. या विमानांच्या मदतीने वैद्यकीय साहित्य, कर्मचारी आणि उपकरणांची संबंधित ठिकाणी ने आण केली जात आहे. आतापर्यंत हवाई दलाने ७५ ऑक्सिजन कंटेनर आणले आहेत आणि अजूनही आणण्यात येत आहेत.

    Air force doing great job in corona war

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका