• Download App
    चीनसोबतचा तिढा कायम, पूर्व लडाखमध्ये हवाई दलाची तैनाती सुरूच, हवाई दल प्रमुखांची माहिती|Air force deployment in East Ladakh continues, says Air Chief

    चीनसोबतचा तिढा कायम, पूर्व लडाखमध्ये हवाई दलाची तैनाती सुरूच, हवाई दल प्रमुखांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चीनसोबतचा तिढा अद्याप कायम असल्याने पूर्व लडाखमध्ये भारतीय हवाई दलाची तैनाती सुरूच असून, आवश्यकता भासल्यास तेथील फौजांची संख्या वाढवण्यास हवाई दल सज्ज आहे, असे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी शनिवारी सांगितले.Air force deployment in East Ladakh continues, says Air Chief

    दुंडिगल येथील एअर फोर्स अकादमीतील एका संयुक्त पदवीदान परेडनिमित्त पत्रकारांशी बोलताना एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी म्हणाले, पूर्व लडाखच्या काही भागांतून सैन्यमाघारी झाली असली, तरी संपूर्ण सैन्य अद्याप माघारी गेलेले नाही.



    मी फार तपशील सांगू शकणार नाही, मात्र एवढे सांगणे पुरेसे आहे की आम्ही तेथे तैनात आहोत. या भागात आमच्यापुढे उभे ठाकणाऱ्या कुठल्याही आव्हानाला अत्यंत कमी वेळात तोंड देण्याची आमची तयारी आहे. अर्थातच, गरज भासली तर आम्ही अधिक सैन्य तैनात करू.

    Air force deployment in East Ladakh continues, says Air Chief

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले