• Download App
    विमान प्रवास पुन्हा महागला, तिकीट दरांत बारा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय|Air fare will increased due to corona crisis

    विमान प्रवास पुन्हा महागला, तिकीट दरांत बारा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – विमान प्रवासाच्या तिकीट दरांत १२.७५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने जाहीर केला. यामुळे दिल्ली मुंबई प्रवासाच्या फक्त तिकीटाचे दर १२०० ते १६०० रूपयांनी वाढले आहेत.Air fare will increased due to corona crisis

    यामुळे उडान योजनेच्या विमान तिकीटांचे दर कमालीचे वाढले असून आता दिल्ली ते मुंबई या एका वेळच्या प्रवासासाठी ५३०० ते सुमारे १५००० रूपये मोजावे लागणार आहेत. यात प्रवासी सुरक्षा शुल्क (किमान १५० रूपये) व जीएसटीमुळे आणखी वाढ होईल.



    यानुसार किमान तिकीट दर ४७०० वरून ५२८७ व कमाल दर १३,००० ते १४,६२५ रूपये होतील. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीनंतर एका वर्षांत ही चौथ्या वेळेस विमान तिकीट दरवाढ करण्यात आली आहे.
    कोरोना काळात सरकारकडून आर्थिक सहाय्य न मिळाल्याने विमान कंपन्या आर्थिक चणचणीच्या संकटात आहेत. त्यांच्या मागणीनुसार आणि इतर कारणांमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद असलेली देशांतर्गत विमान वाहतूक २५ मे पासून टप्प्याटप्याने सुरू करण्यात आली आहे. सध्या ७२.५ टक्के विमानसेवा सुरू झाली आहे. मात्र अजूनही प्रवासी विमानप्रवास अपेक्षित संख्येने करत नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

    Air fare will increased due to corona crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashi Tharoor : थरूर म्हणाले- 1989-90 मध्ये काश्मीरातून दहशतवाद सुरू झाला; आता दिल्ली-मुंबईपर्यंत पसरला

    दिल्ली स्फोटातील कार मालकाला अटक; एनआयएने आमिरला दिल्लीतून ताब्यात घेतले, अतिरेकी उमरसोबत रचला होता स्फोटाचा कट

    OBC reservation : ओबीसींना कमी आरक्षण मिळाले; OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांचा इलेक्शन कमिशनवर आरोप, कोर्टात जाण्याचा इशारा