विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे सुपूत्र एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया वायुदल प्रमुख पदावरुन सेवानिवृत्त झाले असून एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी त्यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारली.Air Chief Marshal Vivek Chaudhary took chargeas the Chief of Air Staff
एअर चीफ मार्शल विवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत. त्यांनी नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले व पुढे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले. 29 डिसेंबर 1982 रोजी ते वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले.
त्यांनी यापूर्वी वायुदलाचे उपप्रमुख तसेच वायुदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे. वायुदलात त्यांनी कमांड, स्टाफ आदी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ‘मिग’ आणि ‘सुखोई’ ही लढाऊ विमाने उडविण्याचा ३८०० तासांचा त्यांना अनुभव आहे.
वायुदलाने राबविलेल्या सियाचीन येथील ‘ऑपरेशन मेघदूत’ आणि कारगिल युद्धातील ‘ऑपरेशन सफेद सागर’ या मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. वायुदालातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 2004 मध्ये वायुदल पदक, विशिष्ट पदक, २०१५ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१ मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
Air Chief Marshal Vivek Chaudhary took chargeas the Chief of Air Staff
महत्त्वाच्या बातम्या
- कन्हैया कुमार हा तर रंग बदलणारा सरडा, राहूल गांधींनी बाहेर काढल्यावर भाजपातही प्रवेश करू शकतो, चित्रपट निर्माते अशोक पंडित यांची टीका
- मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयकडून समन्स
- आमचे कायदा मंत्री एक उत्तम डान्सर, पंतप्रधानांनी केले किरेन रिजिजू यांचे कौतुक
- ऑक्टोबर महिन्यात दररोज एक कोटी लोकांचे लसीकरण, सरकार २८ कोटी लसी विकत घेणार
- सारंगी महाजन करणार राजकारणात प्रवेश, काय घडलं याबाबत वेबसिरीजही काढणार