• Download App
    ओवैसींच्या AIMIM चा तामिळनाडूत जयललितांच्या AIADMK ला पाठिंबा; पण हैदराबादेतला प्रभाव ओसरला!! AIMIM extends its support to AIADMK in the coming Lok Sabha elections

    ओवैसींच्या AIMIM चा तामिळनाडूत जयललितांच्या AIADMK ला पाठिंबा; पण हैदराबादेतला प्रभाव ओसरला!!

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष AIMIM ने तामिळनाडूत नवी इनिंग सुरू करत (कै.) जयललितांचा पक्ष AIADMK ला पाठिंबा जाहीर केला आहे. AIADMK पक्षाने भाजपशी युती करायला नकार दिला, त्याचबरोबर सीएए आणि एनआरसी कायद्यांना विरोध केला म्हणून AIMIM ने पक्षाने लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीतही हा पाठिंबा कायम राहील, असे असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवरून जाहीर केले आहे. AIMIM extends its support to AIADMK in the coming Lok Sabha elections

    दस्तुरखुद्द असदुद्दीन ओवैसी जुन्या हैदराबाद मधून लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा उभे आहेत. परंतु, यावेळीची निवडणूक त्यांना फार “जड” होत चालली आहे. कारण त्यांच्यासमोर भाजपने प्रख्यात नृत्यांगना आणि समाजसेविका माधवी लता यांना उभे केले आहे. आपल्या फायर ब्रँड वक्तव्यामुळे माधवी लता या देशभरात प्रसिद्ध होत चालल्या आहेत. हैदराबादची लढत आता राष्ट्रीय पातळीवरची दखल घेणारी बनली आहे. त्यात असदुद्दीन ओवैसी यांच्यापेक्षा माधवी लता यांच्या उमेदवारीचा सिंहाचा वाटा आहे.

    माधवी लता यांना जुन्या हैदराबाद मतदारसंघातल्या मुस्लिम महिलांचाही पाठिंबा आहे. जुन्या हैदराबाद मतदारसंघातल्याच एकगठ्ठा मुस्लिम मतांच्या जोरावर असदुद्दीन ओवैसी चार वेळा लोकसभेत पोहोचले होते. परंतु, आता मुस्लिम मतांच्या विभाजनातून आणि महिला मतदारांच्या वाढत्या टक्केवारीतून माधवी लतांनी ओवैसी यांच्यापुढे जबरदस्त टक्कर देणारे आव्हान उभे केले आहे.

    ओवैसी यांची त्यामुळे तारेवरची कसरत होत असून एकीकडे हैदराबाद मध्ये त्यांना लक्ष घालावे लागत आहे तर दुसरीकडे ते कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाला पाठिंबा देऊन आपले नाव चर्चेत ठेवत आहेत. तामिळनाडू जयललितांच्या पक्षाला पाठिंबा देणे हा त्यातलाच एक प्रकार आहे बाकी त्यासाठी त्यांनी दिलेली सीएए, एनआरसी ला विरोध वगैरे कारणे जुनीच आहेत.

    AIMIM extends its support to AIADMK in the coming Lok Sabha elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक