• Download App
    माणिपूरला ईशान्य भारतातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचे ध्येय; अमित शाह यांचा निर्धार । Aim to make Manipur the best state in Northeast India; Amit Shah's decision

    माणिपूरला ईशान्य भारतातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचे ध्येय; अमित शाह यांचा निर्धार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गेल्या ५ वर्षांत आम्ही राज्याचा विकास करून हिंसाचारमुक्त केल्याचा दावा अमित शहा यांनी केला. पुढील५ वर्षांत मणिपूरला ईशान्य भारतातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचे आमचे ध्येय आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. Aim to make Manipur the best state in Northeast India; Amit Shah’s decision

    मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी आज मणिपूरमध्ये सांगितले की, काँग्रेसच्या काळात राज्यात अस्थिरता, अतिरेकी आणि विषमता होती. त्याचवेळी भाजपच्या राजवटीत नावीन्य, पायाभूत सुविधा आणि एकात्मता सुरू झाली.



    अमित शाह म्हणाले की, आम्हाला मणिपूरला देशातील सर्वात मोठे स्पोर्ट्स हब बनवायचे आहे. आम्हाला या भागातील तरुणांना ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांपासून मुक्त करायचे आहे आणि त्यांना ऑलिम्पिक खेळांमध्ये समाविष्ट करायचे आहे, हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे.

    अमित शाह म्हणाले की, मणिपूर दीर्घकाळापासून इनर लाइन परमिटची मागणी करत आहे. राज्याला जे हवे होते ते पंतप्रधान मोदींनी दिले. मणिपूरच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ २५ कोटी रुपयांचे संग्रहालयही बांधले जात आहे. अमित शाह म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच पहाड आणि दऱ्यांमध्ये लढाई होईल याची काळजी घेतली आहे.

    ते म्हणाले की, ईशान्येकडील राज्यांमधील ९५०० हून अधिक दहशतवादी संघटनांशी संबंधित तरुणांनी आत्मसमर्पण केले आहे आणि स्वतःला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले आहे.

    Aim to make Manipur the best state in Northeast India; Amit Shah’s decision

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसच्या लोकसभेतल्या उपनेत्याचे पाकिस्तान कनेक्शन; आसाम सरकारच्या हाती SIT चा अत्यंत स्फोटक रिपोर्ट!!

    CP Radhakrishnan : सीपी राधाकृष्णन यांनी 15 वे उपराष्ट्रपती म्हणून घेतली शपथ; समारंभाला उपस्थित राहिले जगदीप धनखड

    राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदी शपथविधी; 21 जुलै नंतर जगदीप धनखड पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी!!