• Download App
    AIADMK तामिळनाडूत भाजप + अण्णा द्रमुक होतेय पुन्हा एकी; स्टालिन अण्णांची उद्ध्वस्त करण्या खेळी!!

    AIADMK तामिळनाडूत भाजप + अण्णा द्रमुक होतेय पुन्हा एकी; स्टालिन अण्णांची उद्ध्वस्त करण्या खेळी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. के. स्टालिन यांनी सीमांकन अर्थात delimitation च्या मुद्द्यावरून अकांड तांडव करत छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांच्या बैठकीचा फार्स केला. पण त्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे हजर राहिले नाहीत. त्यामुळे स्टालिन अण्णांची गाडी थोडी पंक्चरच झाली होती. ती आता तामिळनाडूतच आणखी पंक्चर करण्याची खेळी भाजपा आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यांनी खेळली.

    अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पलानी स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मध्यंतरी निर्माण झालेल्या दुरावा कमी केला आणि दोन्ही पक्षांच्या एकत्रित करण्याचा मार्ग त्यांनी खुला केला.

    तामिळनाडूची 2026 ची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन स्टालिन अण्णांनी मोठी खेळी रचली होती. त्यासाठी त्यांनी भाषा वादाचा चपखल वापर करून मोदी सरकारला घेरले होते. मोदी सरकार तामिळनाडू वर हिंदी भाषा लादत आहे असा आभास निर्माण करून त्यांनी दक्षिणेतल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा जमावडा करायचा प्रयत्न केला, पण त्याला फक्त रेवंत रेड्डी या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पिनराई विजयने या केरळच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला, पण वर उल्लेख केलेले मुख्यमंत्री हजरच राहिले नाहीत, तरीदेखील स्टालिन अण्णांनी त्या बैठकीचा फार मोठा देखावा करून राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवली.

    मात्र त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णा मलाई यांनी संपूर्ण राज्यभर स्टालिन अण्णांच्या भ्रष्टाचाराचा डंका पिटून अण्णांच्या खेळीला तिथेच धक्का दिला होता, पण तामिळनाडूतल्या सर्वपक्षीय बैठकीत हजर राहिलेल्या अण्णा द्रमूकने सुरुवातीला भाजप विरोधातली भूमिका घेतली होती, ती सौम्य करून पलानी स्वामी अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले. जयललिता राजकीय पटलावर नाहीशा झाल्यानंतर पलानी स्वामी यांनी तामिळनाडूचे नेतृत्व केले, पण ते संपूर्ण राज्यात स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यात कमी पडले. सुरुवातीला त्यांनी भाजपपासून आंतर राखले, पण आता राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर योग्य वेळ येताच त्यांनी भाजपशी पुन्हा जवळीक साधली. यातून भाजप आणि अण्णा द्रमुक जवळ आले, तर अण्णांच्या स्वप्नाला तामिळनाडूतच सुरुंग लागणे कठीण नसल्याचे आकडेवारी सांगते.

    AIADMK Edappadi K Palaniswami met Amit Shah in Delhi,

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Government : फेब्रुवारीपासून महागाई मोजण्याची पद्धत बदलेल; सरकार नवीन मालिका जारी करणार

    Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- EC सरकारला न सांगता निरीक्षक नियुक्त करत आहे; पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून SIR मध्ये 58 लाख नावे वगळली

    Udayanidhi : उदयनिधी म्हणाले- तामिळनाडूवर हिंदी लादण्याची परवानगी मिळणार नाही; केंद्रावर आरोप