विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. के. स्टालिन यांनी सीमांकन अर्थात delimitation च्या मुद्द्यावरून अकांड तांडव करत छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांच्या बैठकीचा फार्स केला. पण त्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे हजर राहिले नाहीत. त्यामुळे स्टालिन अण्णांची गाडी थोडी पंक्चरच झाली होती. ती आता तामिळनाडूतच आणखी पंक्चर करण्याची खेळी भाजपा आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यांनी खेळली.
अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पलानी स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मध्यंतरी निर्माण झालेल्या दुरावा कमी केला आणि दोन्ही पक्षांच्या एकत्रित करण्याचा मार्ग त्यांनी खुला केला.
तामिळनाडूची 2026 ची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन स्टालिन अण्णांनी मोठी खेळी रचली होती. त्यासाठी त्यांनी भाषा वादाचा चपखल वापर करून मोदी सरकारला घेरले होते. मोदी सरकार तामिळनाडू वर हिंदी भाषा लादत आहे असा आभास निर्माण करून त्यांनी दक्षिणेतल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा जमावडा करायचा प्रयत्न केला, पण त्याला फक्त रेवंत रेड्डी या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पिनराई विजयने या केरळच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला, पण वर उल्लेख केलेले मुख्यमंत्री हजरच राहिले नाहीत, तरीदेखील स्टालिन अण्णांनी त्या बैठकीचा फार मोठा देखावा करून राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवली.
मात्र त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णा मलाई यांनी संपूर्ण राज्यभर स्टालिन अण्णांच्या भ्रष्टाचाराचा डंका पिटून अण्णांच्या खेळीला तिथेच धक्का दिला होता, पण तामिळनाडूतल्या सर्वपक्षीय बैठकीत हजर राहिलेल्या अण्णा द्रमूकने सुरुवातीला भाजप विरोधातली भूमिका घेतली होती, ती सौम्य करून पलानी स्वामी अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले. जयललिता राजकीय पटलावर नाहीशा झाल्यानंतर पलानी स्वामी यांनी तामिळनाडूचे नेतृत्व केले, पण ते संपूर्ण राज्यात स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यात कमी पडले. सुरुवातीला त्यांनी भाजपपासून आंतर राखले, पण आता राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर योग्य वेळ येताच त्यांनी भाजपशी पुन्हा जवळीक साधली. यातून भाजप आणि अण्णा द्रमुक जवळ आले, तर अण्णांच्या स्वप्नाला तामिळनाडूतच सुरुंग लागणे कठीण नसल्याचे आकडेवारी सांगते.
AIADMK Edappadi K Palaniswami met Amit Shah in Delhi,
महत्वाच्या बातम्या
- दोंडाईचा सौर प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे ऊर्जा विभागाला विशेष निर्देश, म्हणाले…
- Sanjay Shirsat सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांची घोषणा; 25 हजार विद्यार्थ्यांसाठी 125 वसतिगृहे सुरू करू, 1500 कोटींचा निधी राखीव
- Koradi ‘’कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा’’ ; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश!
- कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर टिप्पणी केली होती, ‘त्या’ स्टुडिओवर पडला BMCचा हातोडा