• Download App
    अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट खटल्यात तब्बल 38 आरोपींना फाशीची शिक्षा; देशातली पहिली घटना!!Ahmedabad serial bomb blast

    Ahmedabad serial bomb blast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट खटल्यात तब्बल 38 आरोपींना फाशीची शिक्षा; देशातली पहिली घटना!!

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : अहमदाबाद मध्ये सन 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील तब्बल 38 आरोपींना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे.Ahmedabad serial bomb blast

    अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमित पटेल यांनी दहशतवाद प्रतिबंधक युएपीए कायद्याखाली 38 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. अहमदाबादच्या साखळी बॉम्बस्फोटात एकूण 56 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 200 हून अधिक जण जखमी झाले होते. 2002मध्ये गोधरा कांड आणि दंगल घडल्यानंतर त्याचा सूड उगवण्यासाठी जम्मू काश्मीर मधील दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी अहमदाबाद मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

    आज तब्बल 13 वर्षानंतर आज प्रत्यक्षात 38 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यातून 28 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    Ahmedabad serial bomb blast

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Global Food : जगभरात खाद्यपदार्थ 3 वर्षांत सर्वात महाग; अमेरिका-इराण युद्धामुळे पुरवठा साखळी तुटण्याचा परिणाम, UNने म्हटले- आणखी वाढतील दर

    TVK : मुख्यमंत्री विजयचा शपथविधी समारंभातच फुल टू इमोशनल ड्रामा; राहुल गांधींबरोबरही सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड!!

    Delhi Terror Alert : दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट; :इंटेलिजन्सने म्हटले- गोळीबार आणि आत्मघाती हल्ला देखील होऊ शकतो