वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी मोठा विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटने टेकऑफ घेतल्यानंतर हा अपघात झाला. या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत होते, अशी माहिती एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने दिली आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. हे आता त्यांच्या नावाचा बोर्डिंग पास समोर आल्यानंतर स्पष्ट झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी अपघातानंतर ट्विट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अहमदाबादला पोहोचले आहेत.
विजय रूपाणी यांच्या प्रवासाची माहिती आधी फक्त सूत्रांमधून समोर येत होती, पण आता त्यांच्या नावाचा अधिकृत बोर्डिंग पास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे बातमीला दुजोरा मिळाला असून, त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे, मात्र याबाबत अजून अधिकृत पुष्टी बाकी आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस व वैद्यकीय पथक दाखल झाले असून, प्रवाशांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनानी नगर परिसरात विमान कोसळले. अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितले की, विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी सांगितले की, विमानतळाजवळील मेघनानी नगर येथे विमान कोसळले.
Ahmedabad Air India plane Crash
महत्वाच्या बातम्या
- Karnataka : बेल्लारीतील काँग्रेस खासदार अन् कर्नाटकातील तीन आमदारांवर EDचे छापे
- DK Shivakumar : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार विराट कोहलीची RCB टीम खरेदी करणार?
- Rajiv Ghai : ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्या मुलीची भावनिक पोस्ट चर्चेत!
- Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, आता उपस्थित केला ‘हा’ मुद्दा!