• Download App
    Ahmed Patel बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लवकरच काँग्रेसमध्ये फूट पडेल असे राजकीय भाकीत केले होते.

    अहमद पटेलांचे चिरंजीव काँग्रेस फोडायला तयार; वडिलांच्या नावाने नवी काँग्रेस स्थापणार!!; पण पक्ष चालणार किती आणि कसा??

    बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लवकरच काँग्रेसमध्ये फूट पडेल असे राजकीय भाकीत केले होते. त्यांचे भाकीत पूर्ण करायची तयारी काँग्रेसमध्ये एकेकाळी “चाणक्य” म्हणून ओळखले गेलेल्या एका नेत्याच्या मुलाने चालविली. Ahmed Patel

    सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार सचिव अहमद पटेल यांचे चिरंजीव फैजल पटेल यांनी काँग्रेस फोडून वडिलांच्याच नावाने काँग्रेस (अहमद पटेल) या पक्षाची स्थापना करण्याची तयारी चालविली. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांनी त्याची जाहीर वाच्यता केली. लवकरच मी काँग्रेस फोडेन आणि काँग्रेस (एपी) नावाने नवा पक्ष स्थापन करेन, असे ट्विट फैजल पटेल यांनी केले. मात्र त्यांच्या या निर्णयाला त्यांची बहीण मुमताज पटेल हिने विरोध केला.



    अहमद पटेल यांना काँग्रेसमध्ये वेगळे महत्त्व होते. सोनिया गांधींचे ते राजकीय सल्लागार आणि सचिव असल्याने त्यांच्या शब्दाला विशिष्ट वजन होते. काँग्रेसमधल्या अनेक निर्णय यांच्या पाठीमागे अहमद पटेल यांचे राजकीय कौशल्य होते, असे अनेकदा बोलले गेले. काँग्रेस मधले अनेक महत्त्वाचे निर्णय अहमद पटेल यांनी घेऊन मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा वर्चस्व मिळविले होते.

    – अहमद पटेलांच्या पुढच्या पिढीला महत्त्व नाही

    परंतु ते गेल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या पुढच्या पिढीला फारसे महत्त्व दिले नाही, कारण त्यांचे तेवढे कर्तृत्व नव्हते. पण आता पक्ष महत्त्वच देत नाही हे लक्षात येताच, अहमद पटेल यांच्या चिरंजीवांनी बंडखोरीची तयारी केली अनेक जुन्या नेत्यांनी जशी बंडखोरी करून नवीन काँग्रेस काढली, तशीच काँग्रेस (अहमद पटेल) इरादा जाहीर केला. त्यानंतर केलेल्या ट्विट मधून त्यांनी डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनविण्याची वकालत केली. डी. के. शिवकुमार एक दिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील, असे अहमद पटेल म्हणाले होते. सिद्धरामय्या यांना सुद्धा अहमद पटेल यांनीच जेडीएस मधून फोडून काँग्रेसमध्ये आणले होते. आता सिद्धरामय्या यांनी सन्मानाने राजीनामा देऊन बाजूला व्हावे, अशी सूचना फैजल पटेल यांनी ट्विट मधून केली.

    – नवा पक्ष चालणार कसा आणि किती??

    या ट्वीट मधून फैजल पटेल यांनी आपल्या पित्याचे राजकीय महत्त्व किती होते हे आपल्या समर्थकांवर ठसविण्याचा प्रयत्न केला. पण पिता राजकीय दृष्ट्या कर्तृत्ववान असला तरी पुत्र तेवढाच कर्तृत्ववान आहे का??, नवा पक्ष निर्माण करून तो चालवायची त्याची क्षमता आहे का??, हे कळीचे सवाल या निमित्ताने समोर आले. ज्यांची उत्तरे अजून तरी कोणी फैजल पटेल यांना विचारलेली नाहीत. त्यामुळे ते त्यांची उत्तरे द्यायच्या पण फंदात पडले नाहीत.

    Ahmed Patel’s son ready to break Congress; Will form a new Congress in his father’s name

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhattisgarh : केरळमध्ये छत्तीसगडच्या मजुराला बांगलादेशी समजून मारहाण, मृत्यू; मारहाणीमुळे 80 हून अधिक जखमा

    Iltija Mufti : नितीश यांच्या विरोधात मेहबूबा मुफ्तींच्या मुलीने दाखल केली FIR; म्हणाल्या- पुढच्या वेळी नकाबला हात लावला तर आयुष्यभर लक्षात राहणारा धडा शिकवू

    मुंबईत स्वतंत्र, आघाडी इतरत्र; काँग्रेसच्या भूमिकेवरील संशय दूर; ठाकरे बंधूंच्या युतीत पवारांचा खोडा!!