- गुजरात एसआयटीचा धक्कादायक खुलासा
वृत्तसंस्था
अहमदाबाद : सन 2002 च्या गुजरात दंग्याच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार हादरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी तिस्ता सेटलवाड, गुजरातचे त्यावेळचे पोलीस महासंचालक आर बी. श्रीकुमार आणि आयपीएस अधिकारी संजीव भट यांना 30 लाख रुपये दिले होते, असा धक्कादायक खुलासा गुजरात पोलिसांच्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमने कोर्टात केला आहे. तिस्ता सेटलवाड आणि अन्य दोघांच्या जामीन अर्जाला विरोध करताना गुजरात एसआयटीने कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
Ahmed Patel gave Tista Setalwad 30 lakh rupees to shake the Modi government
2002 च्या गुजरात दंग्याच्या वेळी तत्कालीन सरकार दंगल आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे गुजरातच्या सरकारी यंत्रणेला हाताशी धरून त्यावेळचा केंद्रातील सत्ताधारी काँग्रेस पक्ष मोदी सरकार हादरवण्याचाच प्रयत्न करत होता. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमदनगर यांनी तिस्ता सेटलवाड, पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार आणि आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सुरुवातीला पाच लाख रुपये दिले आणि नंतर 25 लाख रुपये दिले होते. गुजरातचे सरकार अस्थिर करायचे आणि त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवायचे हा कट या चौघांनी रचला होता. त्यासाठीच त्यावेळी 30 लाख रुपये एवढी रक्कम अहमद पटेल यांनी या तिघांना दिली होती, असे गुजरात एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार आणि संजीव भट यांना गुजरात एसआयटीने अटक केली आहे. 2 जुलै 2022 रोजी त्यांना गुजरात कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयात कोठडीत पाठवले होते. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्याच्या वेळी एसआयटीने प्रतिज्ञापत्र दाखल करून वरील धक्कादायक खुलासा केला आहे.
एहसान जाफरी कटात सामील
इतकेच नाही तर तिस्ता सेटलवाड यांना त्यावेळच्या यूपीए सरकारने पद्मश्री देखील प्रदान केली होती, अशा बातम्या आहेत. गुजरात दंग्यांमध्ये मारले गेलेले काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी हे देखील मोदीविरोधी कटात सामील होते, अशा बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत.
Ahmed Patel gave Tista Setalwad 30 lakh rupees to shake the Modi government
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील 8000 सहकारी संस्थांच्या निवडणुका ढकलल्या पुढे!
- आरे कारशेड मुद्द्यावर आदित्य ठाकरे आम आदमी पार्टीच्या टार्गेटवर; ठाकरे सरकारने मुंबईला बनवले मूर्ख!!
- नामांतर ते आरक्षण : ठाकरे गट – राष्ट्रवादीचे सकाळ – दुपारचे आरोप संध्याकाळी शिंदे फडणवीसांकडून खारीज!!
- शिंदे – फडणवीस लागलेत आपापल्या प्रचाराला; सुप्रियाताई – अजितदादा लावतायेत त्यांच्यात कलगीतुरा!!