• Download App
    कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने काँग्रेसच्या ‘बालेकिल्ल्यात’ फडकवला भगवाAhead of the Karnataka assembly elections the BJP raised saffron at the Congress stronghold

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने काँग्रेसच्या ‘बालेकिल्ल्यात’ फडकवला भगवा

     काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा गृहजिल्हा असलेल्या कलबुर्गी येथे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाची बाजी

    विशेष प्रतिनिधी

    कलबुर्गी : दक्षिण भारत हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. विधानसभेपासून लोकसभेपर्यंत खासदारांची संख्या लक्षणीय असायची. मग ते तामिळनाडूतून निवडून आलेले खासदार असोत की कर्नाटकात किंवा आंध्र प्रदेशातून. या राज्यांमध्ये काँग्रेसचा डंका वाजायचा, पण आता इथे काँग्रेसला राजकीय ग्रहण लागले आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यापासून दक्षिण भारतातून काँग्रेसची जमीन सरकली आहे. जवळपास दीड दशकांपासून सत्तेत असलेली काँग्रेस या विधानसभा निवडणुकीत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र काँग्रेससाठी हा मार्ग तितकासा सोपा दिसत नाही. Ahead of the Karnataka assembly elections the BJP raised saffron at the Congress stronghold

    पंतप्रधान मोदी ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करणार; वाराणसीला देणार १ हजार ७८० कोटींची भेट

    कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना जमिनीवर खूप काम करण्याची गरज आहे. दक्षिण भारतात काँग्रेससमोर केवळ भाजपाच नाही तर प्रादेशिक पक्षांचेही मोठे आव्हान आहे. याला सामोरे जाण्यासाठी पक्षाने मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. दक्षिण भारतातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची अवस्था अशी झाली आहे की, संसद, विधानसभेपर्यंत पोहोचणे तर दूरच, पक्षाचे नगरसेवक किंवा कार्यकर्ते महापालिकांमध्येही आपले स्थान निर्माण करू शकत नाहीत.

    खर्गे यांच्या मतदारसंघात भाजपाचा विजय

    ताजे उदाहरण म्हटले तर कर्नाटक महापालिका निवडणुकीचे आहे. जिथे भाजपाचा भगवा फडकला आहे आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. महापालिका निवडणुकीत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही भाजपाने बाजी मारली आहे. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा गृहजिल्हा असलेल्या कलबुर्गी येथे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. कर्नाटकमध्ये दोन महिन्यांनी विधानसभा निवडणुका प्रस्तावित आहेत. महापालिका निवडणुकीत पक्षाचा पराभव ही काँग्रेससाठी निश्चितच वाईट बातमी आहे. कारण खर्गे जिथून आले तेथे काँग्रेस स्वतःला प्रबळ असल्याचा दावा करते, पण विधानसभा निवडणुकीपूर्वी महापौर आणि उपमहापौरांची खुर्ची जाणे पक्षासाठी चिंताजनक आहे.

    महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत झाली, मात्र भाजपाचे उमेदवार विशाल दर्गी विजयी झाले. विशाल दर्गी यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कपनूर यांचा पराभव केला. त्याचबरोबर शिवानंद पिस्ती यांनी काँग्रेसच्या विजयालक्ष्मी यांचा पराभव करत उपमहापौरपद काबीज केले आहे.

    Ahead of the Karnataka assembly elections the BJP raised saffron at the Congress stronghold

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र