MSP चा फॉर्म्युला सांगितला; जाणून घ्या, कर्जमाफीवर काय सांगितले?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Agriculture शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाच्या घोषणेदरम्यान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी राज्यसभेत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या सर्व पिकांची किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) खरेदी करेल. ही मोदींची हमी आहे. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारवरही निशाणा साधला.Agriculture
राज्यसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मी सभागृहाला आश्वासन देऊ इच्छितो की, शेतकऱ्यांची सर्व पिके किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) खरेदी केली जातील. हे मोदी सरकार असून मोदींनी दिलेली हमी पूर्ण करण्याची हमी आहे.
शिवराज सिंह चौहान यांनीही राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आमचे मित्र जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी एमएस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करू शकत नसल्याचे रेकॉर्डवर सांगितले होते. विशेषत: पिकाच्या किंमतीपेक्षा 50 टक्के अधिक रक्कम देण्यास नकार दिला. याची नोंद माझ्याकडे आहे. चौहान यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ माजी कृषी राज्यमंत्री कांतीलाल भुरिया, कृषिमंत्री शरद पवार आणि केव्ही थॉमस यांचा हवाला दिला.
Agriculture Minister’s response in Parliament to farmers’ biggest demand
महत्वाच्या बातम्या
- New government : नवे सरकार, नवे मंत्री, नवे मुद्दे; पण सरकार विरोधात लढण्यासाठी विरोधकांकडे जुनीच हत्यारे!!
- Sambhal violence : संभल हिंसाचारात एक कोटींच्या मालमत्तेचे नुकसान, हल्लेखोरांकडून वसुली करणार प्रशासन
- Sambit Patra : संबित पात्रा यांच्यावर विशेषाधिकार भंगाची नोटीस
- Gujarat : गुजरातेत तोतया ईडी टीमचा सराफा दुकानावर छापा; 11 अटकेत, 1 फरार