• Download App
    कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए - एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी |Agriculture laws repealed, now CAA-NRC repeal these laws; Maulana Arshad Madani's demand to Modi

    कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी

    वृत्तसंस्था

    लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केले. आता त्यापुढची मागणी उठली असून केंद्राने लागू केलेले नागरिकत्वाचा संदर्भातले कायदे सीएए आणि एनआरसी मागे घेण्याची मागणी पुढे आली आहे. जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे प्रमुख मौलाना अर्षद मदानी यांनी ही मागणी केली आहे.Agriculture laws repealed, now CAA-NRC repeal these laws; Maulana Arshad Madani’s demand to Modi

    जनतेची शक्ती मोठी असते. शेतकऱ्यांनी दीड वर्षे आंदोलन केले. त्यांचे दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजले. त्यामुळे त्यांनी कृषी कायदे मागे घेतले. सिटिझन अमेंडमेंट अॅक्ट अर्थात भारतीय नागरिकत्व कायदा सुधारणा कायदा आणि नॅशनल रजिस्ट्रेशन एनआरसी हे कायदे देखील मागे घ्यावेत. कारण त्यामुळे मुसलमान समाज दुखावला जातो, अशी मागणी मौलाना अर्षद मदानी यांनी केली आहे.



    आता या मागणीवरून देखील देशात मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब या निवडणुकांवर हे राजकारण प्रभाव टाकेल. मौलाना अर्षद मदानी यांनी ही मागणी केली असली तरी आता कोणत्या संघटना त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच विरोध करण्यासाठी पुढे येणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    Agriculture laws repealed, now CAA-NRC repeal these laws; Maulana Arshad Madani’s demand to Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार