वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अग्नी 5 या स्वदेशी निर्मित अण्वस्त्रवाहक आंतरखंडीय क्षेपणास्त्राची रात्र चाचणी यशस्वी झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. Agni-5 nuclear-capable ballistic missile which can hit targets beyond 5,000 kms
चीन आणि पाकिस्तान यांचा वाढता धोका लक्षात घेऊन अग्नी 5 अण्वस्त्रवाहक आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी रात्र चाचणी घेण्यात आली आहे. अग्नी 5 या क्षेपणास्त्राचा पल्ला 5000 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. त्यामुळे भारतातील महत्त्वाच्या सामरिक क्षेत्रातून चीनची राजधानी बीजिंग पर्यंत थेट मारा करण्याची क्षमता भारतीय सैन्य दलाने प्राप्त केली आहे.
अग्नी क्षेपणास्त्र मालिका भारतीय संशोधन संस्थाने विकसित केले असून अण्वस्त्र वाहक अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील अग्नी 5 हे सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. त्याची अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमताही सर्वात मोठी आहे आणि त्याची मारक्षमताही 5000 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान यांच्या धोक्याचा परिणामकारक मुकाबला करता येईल, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
Agni-5 nuclear-capable ballistic missile which can hit targets beyond 5,000 kms
महत्वाच्या बातम्या
- मुंबई – सॅनफ्रान्सिस्को थेट विमान सेवा सुरू; अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली – महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्र जोडणार
- FIFA Jihad : मोरोक्को हरल्यामुळे धर्मांध मुस्लिम दंगलीचे लोण फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स मध्ये पोहोचले
- जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच; वडिलांशी DNA झाला मॅच; आफताबचे होते आव्हान; दिल्ली पोलिसांना मोठे यश