• Download App
    अग्निपथ योजना केंद्र सरकारच्या भरती योजनेला बिहारमध्ये "पूर्वनियोजित" विरोध!! Agneepath Yojana: "Pre-planned" opposition to Central Government recruitment scheme in Bihar

    अग्निपथ योजना : केंद्र सरकारच्या भरती योजनेला बिहारमध्ये “पूर्वनियोजित” विरोध!!

    वृत्तसंस्था

    पाटणा : एकीकडे रोजगाराच्या मुद्द्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारला ठोकत राहायचे आणि दुसरीकडे मोदी सरकारने कुठलीही रोजगार भरती योजना आणली की तिच्यात खुसपटे काढून विरोध करायचा असे दुटप्पी धोरण सध्या विरोधकांनी असल्याचे दिसून येत आहे. यातूनच केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ भरती योजनेला विरोध होताना दिसत आहे. Agneepath Yojana: “Pre-planned” opposition to Central Government recruitment scheme in Bihar

    केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन घोषणा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, मंगळवारी ‘अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली असून यादरम्यान तरुणांना अल्प कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या योजनेला बिहारमध्ये तरूणांचा “पूर्वनियोजित” विरोध दर्शवण्यात येत आहे.

    काय घडला प्रकार

    सैन्यात 4 वर्षांपर्यंत तरूणांना अग्निवीर म्हणून भरती करणाऱ्या अग्निपथ योजनेला विरोध सुरू झाला आहे. त्याची सुरुवात बिहारपासून झाली असून बक्सरमधील काही तरुणांनी ट्रेनवर दगडफेक केली आहे, तर मुझफ्फरपूरमध्ये लोक रस्त्यावर आक्रमक होत उतरल्याचे पाहायला मिळाले तर बक्सरमध्ये संतप्त तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा या दिशेला जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, काशी पटना जनशताब्दी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर सुमारे 18 मिनिटे थांबली. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवासी नाराज झाले असून त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.



    या तरतुदींना तरुणांचा विरोध 

    अवघ्या 4 वर्षांसाठी भरती करणे म्हणजे रोजगाराच्या हक्काचे उल्लंघन असल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. मंगळवारीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांनी दिल्लीत या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत 17.5 वर्षांवरील आणि 21 वर्षांपर्यंतच्या तरुणांना अग्निवीर म्हणून भरती करण्यात येईल आणि त्यांना 4 वर्षांसाठी नोकरी मिळेल. यापैकी 25 % तरुणांची पुढील सैन्यात नियमित नोकरीसाठी निवड केली जाईल आणि त्यासाठी स्वतंत्र तपासणी केली जाईल. अग्निवीर म्हणून काम केल्यानंतर, तरुणांना चार वर्षानंतर 11 लाख रुपयांचे एकवेळ पॅकेज दिले जाईल.

    काय आहे अग्निपथ योजना

    या योजनेमुळे देशातील तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. अनेक देशांमध्ये अभ्यास केल्यानंतर ही योजना आणली जात आहे. या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल.

    परंतु ही योजना केंद्रातल्या मोदी सरकारने आणल्यामुळे त्याला विरोध होत असल्याचे उघडपणे दिसत आहे.

    Agneepath Yojana: “Pre-planned” opposition to Central Government recruitment scheme in Bihar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले