वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “अग्निपथ’ योजनेला गैरसमजातून विरोध वाढत असताना केंद्र सरकारने लवचिकता दाखवत भरती वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढवून 23 केली आहे. गुरुवारी हरियाणा, बिहारसह ७ राज्यांत तीव्र निदर्शने झाली. बिहारमध्ये तरुणांनी ५ रेल्वेंना आग लावली. भाजप कार्यालय आणि भाजप आमदारावरही हल्ला चढवला. वेगवेगळ्या राज्यांत ३४ रेल्वे रद्द कराव्या लागल्या.Agneepath Yojana: Flexibility of Central Government; 2 years increase in age limit of firefighters !!
मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षांत भरती झाली नाही. अनेक तरुणांनी त्यापूर्वी परीक्षा दिल्या आहेत. अनेकांनी तयारी केली आहे. त्यामुळे सरकाने अग्निवीर भरतीची मर्यादा फक्त 2022 या वर्षासाठी 23 वयाची केली आहे.
हरियाणातील रोहतक येथे दोन वर्षांपासून सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या सचिन नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. सचिन २२ वर्षांचा झाला होता. मात्र, त्याने आतापर्यंत लेखी परीक्षा दिली नव्हती. देशभरातील वाढते आंदोलन पाहता केंद्र सरकारने रात्री उशिरा उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा २१ वरून वाढून २३ वर्षे केली. ही सूट केवळ या वर्षासाठी राहील. कारण, गेल्या दोन वर्षांपासून लष्करात भरती होऊ शकली नाही आणि लाखो तरुणांनी २१ वर्षे वय ओलांडले आहे.
१००० जवानांच्या बटालियनमध्ये ७०० अग्निवीर
आगामी वर्षांत सरकार अग्निपथ योजनेवर भर देईल. अग्निवीर दरवर्षी निवडले जातील. त्यांची असेसमेंट प्रशिक्षणातून सुरू होईल. दरवर्षी मूल्यांकन होईल. 4 वर्षांनंतर लष्करात पदोन्नतीसाठी नियमित चाचणी होईल, जशी ती आताही होते.
जे २५% अग्निवीर पदोन्नत होऊ शकतील ते लष्करात कायम राहतील. एका बटालियनमध्ये १००० जण असतात. यात १४ ते १८ अधिकारी असतात. अधिकाऱ्यांची भरती अग्निपथातून नव्हे, तर नियमित परीक्षेच्या माध्यमातून होईल. बटालियनमध्ये ७०० शस्त्रसज्ज जवान असतात, त्यात वेगवेगळ्या रँकचे एनसीओ (नॉन कमिशन्ड ऑफिसर) असतात. उदा. सुभेदार, नायब सुभेदार आदी. मात्र, अग्निपथ योजनेद्वारे केवळ जवान निवडले जातील. 4 वर्षांनंतर या जवानांतून २५ % पदोन्नती मिळेल. ते पुढे चालून सुभेदार-नायब सुभेदाराच्या पदापर्यंत पोहोचतील. अशा स्थितीत ते अग्निवीर नव्हे तर नियमित जवान संबोधले जातील.
– याशिवाय सुमारे २८० जवान क्लर्क, चालक, स्वयंपाकही आदी असतात. त्यांची नियुक्तीही अग्निपथ योजनेतूनच होईल. या हिशेबाने पाहिल्यास प्रत्येक बटालियनमध्ये आगामी काळात ७०० सैनिक अग्निपथ योजनेतून येतील. प्रत्येक रेजिमेंटला त्याच्या मापदंडानुसार जवान अग्निपथ योजनेअंतर्गत दिला जाईल.
अग्निपथ योजनेचे फायदे
अग्निपथ योजना ही अग्निपरीक्षा नव्हे तर संधी आहे. यामुळे सशस्त्र दलांत जाण्याच्या संधी वाढतील. आगामी वर्षांत अग्निवीरांची भरती तिप्पट होईल. सेवा पूर्ण झाल्यावर उद्योजक होण्यास इच्छूक जवानांना वित्तीय मदत मिळेल. निवृत्त अग्निवीरांना केंद्रीय दलांत आणि राज्य पोलिस भरतीत प्राधान्य दिले जाईल. अग्निवीर समाजासाठी धाेका बनण्याची शक्यता निराधार आहे.
Agneepath Yojana: Flexibility of Central Government; 2 years increase in age limit of firefighters !!
महत्वाच्या बातम्या
- दानवे × देसाई : राज्यसभा निवडणुकीत “घोडे” गाजले; विधान परिषद निवडणुकीत “मांजराची पिल्लं” गाजताहेत!!
- देहूतील (न)भाषण : अजितदादा म्हणाले, विषय संपला!!; फडणवीस म्हणाले, अजितदादांच्या विरुद्ध राष्ट्रवादीतून षडयंत्र!!
- महाराष्ट्र भाजप : बारामतीत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी “राजकीय वात” राम शिंदेंच्या हाती!!