• Download App
    EVM march काँग्रेसच्या EVMs विरोधी यात्रेत मित्र पक्षांचा खोडा; काँग्रेसी राज्यांमधून नेणार का यात्रा??, सवाल केला!!

    EVM march : काँग्रेसच्या EVMs विरोधी यात्रेत मित्र पक्षांचा खोडा; काँग्रेसी राज्यांमधून नेणार का यात्रा??, सवाल केला!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसच्या ईव्हीएम विरोधी यात्रेत मित्र पक्षांनीच अखेर खोडा घातला. तुम्ही काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यातून तुमची यात्रा नेणार का??, असा सवाल मित्र पक्षांनी काँग्रेसला केला.

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतल्या नेत्यांची बैठक झाली. त्याच्या अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी होते. त्यांनी संसदेमध्ये एकमुखाने अदानी आणि ईव्हीएम हे मुद्दे विरोधी पक्षांनी उपस्थित केले पाहिजेत, यावर भर दिला. मात्र अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस यांनी राहुल गांधींचे मुद्दे खोडून काढले. संसदेमध्ये आपण बेरोजगारी, देशातला भ्रष्टाचार, वाढता जातीयवाद, युवकांच्या शिक्षणाचे प्रश्न वगैरे मुद्द्यांवर भर देऊन चर्चा केली पाहिजे. केवळ एक-दोन मुद्द्यांवर भर देण्यात काही मतलब नाही, असे या दोन्ही पक्षाच्या खासदारांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.

    Sadabhau Khot सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल- मुस्लिमबहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात, तिथे EVM मविआसाठीच कसे सेट होते?

    त्याचवेळी समाजवादी पार्टी आणि तृणमूळ काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधी ईव्हीएम विरोधात यात्रा काढतील, पण ती यात्रा ते काँग्रेसने जिंकलेल्या राज्यांमधून नेणार आहेत का??, असा सवाल केला. या सवालाचे राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर दिले नाही. पण त्या बैठकीच्या निमित्ताने विरोधकांमधले मतभेद मात्र समोर आले.

    against Congress anti-EVM march

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu Kashmir, : जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीतही सैन्य मोहीम; बर्फाळ आणि दुर्गम पर्वतांमध्ये गस्त वाढवली

    Randhir Jaiswal, : भारताने म्हटले- बांगलादेशातील हिंदूच्या हत्येकडे दुर्लक्ष करू शकत नाही, फरार ललित मोदी-माल्याला परत आणू

    V.V. Rajesh : 4 दशकांपासून डाव्यांचा ताबा असलेल्या केरळच्या महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर