विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या ईव्हीएम विरोधी यात्रेत मित्र पक्षांनीच अखेर खोडा घातला. तुम्ही काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यातून तुमची यात्रा नेणार का??, असा सवाल मित्र पक्षांनी काँग्रेसला केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतल्या नेत्यांची बैठक झाली. त्याच्या अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी होते. त्यांनी संसदेमध्ये एकमुखाने अदानी आणि ईव्हीएम हे मुद्दे विरोधी पक्षांनी उपस्थित केले पाहिजेत, यावर भर दिला. मात्र अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस यांनी राहुल गांधींचे मुद्दे खोडून काढले. संसदेमध्ये आपण बेरोजगारी, देशातला भ्रष्टाचार, वाढता जातीयवाद, युवकांच्या शिक्षणाचे प्रश्न वगैरे मुद्द्यांवर भर देऊन चर्चा केली पाहिजे. केवळ एक-दोन मुद्द्यांवर भर देण्यात काही मतलब नाही, असे या दोन्ही पक्षाच्या खासदारांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
त्याचवेळी समाजवादी पार्टी आणि तृणमूळ काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधी ईव्हीएम विरोधात यात्रा काढतील, पण ती यात्रा ते काँग्रेसने जिंकलेल्या राज्यांमधून नेणार आहेत का??, असा सवाल केला. या सवालाचे राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर दिले नाही. पण त्या बैठकीच्या निमित्ताने विरोधकांमधले मतभेद मात्र समोर आले.
against Congress anti-EVM march
महत्वाच्या बातम्या
- Sadabhau Khot सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल- मुस्लिमबहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात, तिथे EVM मविआसाठीच कसे सेट होते?
- Manoj Jarange : भाजप महायुतीला कौल देऊन जनतेने दाखवली सत्तेची दिशा; पण जरांगेंची सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यायची भाषा!!
- Haryana government गायी पाळणाऱ्यांना ‘हे’ सरकार देत आहे 30 हजार रुपये
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांवरील हल्ल्याच्या घटनेवर भाजपचा मोठा दावा!